MaxMaharashtra Impact: तासगाव बाजार समिती संचालक आणि सचिवांना दणका
X
२०१४ मध्ये तासगाव मंजूर झालेल्या तासगाव बाजार समितीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारीची दखल जिल्हा उपनिबंधकांनी घेत संचालक मंडळ आणि सचिवांना चांगलाच दणका दिला आहे.
2014 साली नवीन बाजार समिती तासगाव ला मंजूर झाली होती. यावेळी या तासगाव बाजार समितीचे बांधकामास सुरूवात झाली. हे बांधकाम तासगाव येथील कृषी विभागाच्या कार्यालयाच्या पाठीमागे सुरू करण्यात आले. या नवीन बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोल काळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने हे वृत्त प्रदर्शित केले होते. यानंतर अमोल काळे यांनी वर्षभर या तक्रारीचा पाठपुरावा केला. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पणन विभागाने तासगाव बाजार समितीच्या संचालक व सचिव यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. या नोटिसाच्या अनुषंगाने येत्या काळात संबंधितांवर कारवाई होती की नाही, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.जर संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखट्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा अमोल काळे यांनी दिला आहे. Max Maharashtra ने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.