सूरबहारवादक अन्नपूर्णादेवी काळाच्या पडद्याआड…
X
ज्येष्ठ सूरबहारवादक अन्नपूर्णादेवी यांचे शनिवारी पहाटे ब्रीचकॅण्डी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वडीलांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सुरबहारवादनावर आपले लक्ष केंद्रित करुन आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यांनी त्यांच्या वडीलांनी सरोद, सतार आणि सूरबहार शिकवले. त्यांनी अनेक वादकांना परंतू मनापासून शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना आपले शिष्य बनवून वादनाची कला शिकवली. सरोदवादक आशिष खान, अमित भट्टाचार्य, बहादूर खान, बसंत काबरा, पंडित प्रदीप बारोट आणि बासरीवादक पंडित हरीप्रसाद चौरासिया, पंडित नित्यानंद हळदीपूर यासारखे उत्तम वादक त्यांनी घडवले. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
१९९७ साली त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील सटणा जिल्ह्यातील मैहर शहरात २३ एप्रिल १९२६ रोजी झाला होता. परंतू १३ आॅक्टोबर रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.