ऊसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यात उस उत्पादक अडचणीत...
दुष्काळी बीड जिल्ह्याला यंदा निसर्गानं भरभरुन दिलं. मुबलक पाण्यामुळं उसाचं क्षेत्र वाढलं पण आता उसतोडीसाठी प्रसिध्द असलेल्या बीड जिल्ह्यातील उस उत्पादकांचा उस तोडला जात नाही, अडचणीत उस उत्पादक शेतकऱ्यांच्या दयनीय परीस्थितीवर हरिदास तावरेंचा रिपोर्ट....
X
बीड जिल्हा म्हटला की दुष्काळ कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा याच दुष्काळाच्या झळा अनेक वेळा आपण पाहिल्या आहेत परंतु गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्ह्यात अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळतील याचा अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करून ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांमध्ये जवळपास पावणेदोन ते लाख दोन लाख हेक्टर पर्यंत क्षेत्रावर लागवड झाली आहे परंतु बीड जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर चालणारे सात कारखाने आहेत त्यामध्ये तीनच कारखाने सध्या चालू आहे खाजगी तत्वावर चालणारे चार कारखाने चालू आहे पण या कारखान्याची उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे बीड जिल्ह्यातील पाऊस या कारखान्यांना अतिरिक्त झाला आहे शेतकऱ्याला ऊस लागवडी पासून पूर्ण मेहनत करेपर्यंत हेक्टरी पन्नास ते साठ हजार रुपये पर्यंत खर्च लागतो ऊस चांगला आला तर शेतकरी समाधानी राहतो त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तसेच ऊस तोडणी साठी येणारे मजूर वाहन चालक यांनासुद्धा पैसे मोजावे लागतात त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसे पडतात का नाही हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.
हे बेनं आणलं ते जवळपास सात टन बेने लागलं अडीच हजार रुपये त्यांना हे मिळालं सरी काढणं ,मोगडनं त्याला ट्रॅक्टरचा खर्च मजूर लावून त्याची लागवड केली खताचे भाव गगनाला भिडले आहेत ऊस लागवड करून 19 महिने झाले आहेत कोळी वाल्या कडे गेलं तर कोणी म्हणते दहा रुपये द्या कोणी म्हणते वीस रुपये द्या कारखाना जिम्मेदारी घेत नाही त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे त्यामध्येच आता ऊसाला दशी पडायला लागली आहे उसाचे वजन कमी होत आहे वरचेवर पाणीही कमी पडण्याची शक्यता आहे आता आम्हाला उसाचं नको नको झाला आहे आमच्या वरती फाशी घेण्याची वेळ आली आहे रोजच उठलं की तेच टोळीवाल्यांचं आज येतो उद्या येतो असंच रोज चालू आहे जवळपास माझा 50 हजार रुपये खर्च झाला आहे सर्व मेहनत करण्यासाठी इतका खर्च झाला आहे मात्र कारखाने कुठलीच दखल घ्यायला तयार नाहीत, असं विश्वास बहिरवाळ यांनी सांगितले.
19-19 महिने झाले ऊसाला उसाला तुरा फुटला आहे बीड जिल्ह्यातील कारखाने तर काही सांगायची परिस्थिती नाही कुणी दोन महिने हंगाम सुरू झाल्यावर कारखाने चालू केले तर कुणी आता कारखाने चालू केले आहेत ऊस जात आहे तर तो सोलापूर भागात तर कधी करमाळा भागात जात आहे त्या ठिकाणीही उसाच्या गाड्या लवकर खाली होत नाहीत त्यामुळे या ठिकाणची उसाचे क्षेत्र अजूनही कमी झालेली नाही तर उन्हामुळे उसाचे वजन कमी होऊ लागले आहे आणि उसाचा पूर्ण केर झाला आहे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान आहे शासनाला एक विनंती आहे की काहीतरी मार्ग काढावा व जाईल त्या ठिकाणी घेऊन जावा एवढी विनंती आहे आमची शासनाला ऊसाला तुरा फुटल्यामुळे उसाचे वजन कमी होते व साखरेचे प्रमाण वाढते सुद्धा पाऊस न्यायला कोणी येत नाही आणि त्याची टोळी आहे त्याचाच याठिकाणी जात आहे शेतकरी खरोखरच अस्वस्थ झाला आहे ऊस काढावा तर बाहेर कसा काढावा हाच प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्या पुढे उभा राहिला आहे कारखानदारांनी सुद्धा शेतकर्यांची हेळसांड करायला सुरुवात केली आहे मी आपल्या चैनल च्या माध्यमातून असं प्रशासनाला सांगू इच्छितो की आमचा ऊस नेण्याचा प्रयत्न करावा आणि शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढावे, असं विश्वास बहिरवाळ यांनी सांगितलं.
आपला जिल्हा म्हटला तर ऊस तोड कामगाराचा जिल्हा आहे पण बीड जिल्ह्याची अशी ओळख निर्माण होईल की इथल्याच शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस बांधावर टाकला आहे असं वाटतं अशी परिस्थिती निर्माण होईल जिल्ह्यात सात सहकारी साखर कारखाने आहेत त्यामध्ये बरेच कारखाने बंद आहेत हे कारखाने बंद असल्यामुळे बीड जिल्ह्यातील त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हा तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे पण हा ऊस गेला नाही तर काही दिवसातच बांधावर ऊस तोडून टाकणार यांचा जिल्हा होईल की काय असंच आम्हाला वाटतं, असं रवी कळसाने म्हणाले.
गेल्या दोन वर्षात आम्हाला भरपूर प्रमाणात पाऊस झाला झाल्यामुळे आमच्या परिसरात 80 ते 90 टक्के उसाची लागवड झाली हा ऊस कारखान्यात जाईन अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण जिल्ह्यामधील सात सहकारी साखर कारखाने आहेत त्यापैकी दोनच कारखाने चालू आहेत बाकी पाच कारखाने बंद आहेत त्यामुळे एवढी अडचण आली आहे आज जवळजवळ आमच्या गावातील 50 टक्के पाऊस तसाच आहे सध्या उसामध्ये कशी पडली आहे ऊस वाळून चालली आहेत टोळी वाल्याकडे गेलं तर उडवा उडवीची उत्तरे देतात आज तोडू उद्या तोडू तोडणारे ही फुकट तोडीत नाहीत तेही पैसे घेतात आमच्या गावात जवळपास वीस टोळ्या आहेत तरीपण अर्धा ऊस शिल्लक आहे आता वरचेवर ऊन पडत आहे पाण्याची कमतरता उन्हाळ्यामध्ये भासत आहे लाईटचे प्रश्न अजूनही तसेच आहे अहोरात्र जागून ऊसाला पाणी द्यावे लागते रात्रीचा दिवस करून शेतकऱ्यांनी ऊस पिकवले आहेत मात्र याकडे कारखानदारांनी लक्ष द्यायला पाहिजे असाच राहिला तर तोडून तरी कुठे टाकायचा की अशी अवस्था आमच्या उसाची झाली आहे कारखानदारांनी थोडं लक्ष दिले पाहिजे व टोळीवाल्यांना सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं महिला शेतकरी विमलबाई गणपती बहिरवाळ म्हणाल्या.
बेणे आणून उसाची लागवड केली वाटलं होतं चार पैसे होतील आणि ह्याला नेहिना कुणी डोळे वाले येत नाहीत वाळून चाललाय काय करावा मुदी ,मनी मोडून ऊस लागवड केली आणि याचा एक रुपयाही प्राप्त नाही काय करावं सोडून तरी कुठे टाकावा त्याला माणसं पाहिजेत... सरकारने याचा काहीतरी निर्णय घ्यावा मी ऊस लागवड केली आहे जर आम्ही दुसरी पीक घेतली असती ज्वारी-बाजरी केली असती ऊस लावलाय तर खायला दाणा नाही जनावरांना कडबा नाही.
कर्ज झालंय खंडीभर... उसावर देऊ उसावर देऊन आम्ही कर्ज तरी भरावं कुठपर्यंत आता नातीचं लग्न आहे शिक्षण आहे आता काय करावं शाळा तर तुम्ही शिकवा म्हणतात काही शिकवावं तर आडानी मुलीला कोणीही करत नाही त्यामुळे कसं करावं काय करावं हे आम्हाला समजत नाही कापूस लावला असता पैसा झाला असता ज्वारी लावली असती पैसा झाला असता त्यातच कोरोना आला गेले दोन-तीन वर्षे याच्या मध्येच झाला आहे आता मुलींना शाळेसाठी बीडला जावे लागत आहे रोज म्हणलं तरी शंभर रुपये जायला पुरत नाहीत पेन आहे वही आहे काय म्हणून लागत नाही गाड्या बंद आहेत रिक्षाने जावे लागत आहे... अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया आहेत.
बीड जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षात अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले याच नुकसानीमुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना काही प्रमाणात मिळाली मात्र त्या पिकाचा विमा अजूनही काही शेतकऱ्यांना मिळाला नाही तर एकीकडे अतिवृष्टी मुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आणि याच पाण्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली बीड जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्राचे वर ऊस लागवड झाली आहे तर हा ऊस गाळपासाठी न गेल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे बीड जिल्ह्यात सहकार तत्वावर चालणारे सात सहकारी कारखाने आहेत तर चार खाजगी साखर कारखाने आहेत तर सहकारी तत्वावर चालणारे दोनच कारखाने चालू असल्याने बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस बाहेरच्या जिल्ह्यात पाठवावा लागत आहे त्या ठिकाणी ऊस घेऊन गेलेले वाहन दोन-दोन तीन-तीन दिवस खाली होत नाहीत त्यामुळे उसाचे वजन कमी येत आहे तर दुसरीकडे ऊसतोडणीसाठी मुजर ही मिळत नसल्याने शेतकरी सांगत आहेत या ऊस तोडणी मजुरांना सुद्धा पैसे मोजावे लागत आहेत ट्रॅक्टर ऊस तोडणी साठी एका टोळीला दोन ते तीन हजार रुपये द्यावे लागतात तर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला प्रत्येक खेपेला पाचशे रुपये द्यावे लागतात त्यामुळे इथला शेतकरी मेटाकुटीला आला आहे...
ज्या शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांना आता त्यांच्याकडे असणारी जी जनावरे आहेत त्यांना खाण्यासाठी कडबा वैरण मिळत नाही तर ज्वारी बाजरी गहू ही पीक न घेतल्यामुळे खाण्यासाठी धान्य नाही तर ज्वारी बाजरी गहू आली असती तर आज आम्हाला अडचणीचा सामना करायची गरज पडली नसती असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे आता जिल्ह्यातील कोरूना ची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील पूर्ण कमी झाला आहे त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू केल्यामुळे मुलं शाळेत आहेत त्यांना दररोज जाण्यासाठी पैसे लागत आहेत त्यामुळे दररोजच्या खर्चासाठी लागणारा पैसाही या शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे...