मुलगी शिकली प्रगती झाली बीडमधे संघर्षातून कोमल झाली फौजदार...
प्रतिकुल परीस्थितीत संघर्ष करुन मुलगी शिकली प्रगती झाली असं ज्वलंत उदाहरण बीडमधे पुढं आले आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोमल उबाळेचे एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून संकटात संघर्ष यशाची गुढी उभारु शकते हे सिध्द केलं आहे. प्रतिनिधी हरीदास तावरेंचा रिपोर्ट..
X
बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून इथल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचबरोबर याच जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे गेल्या दोन वर्षात पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करून केली आहे. ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात उसाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचा आपण सर्वांनी पाहिला आहे. त्याचबरोबर याच जिल्ह्यातील दबंग अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांचं नाव घेतलं जातं. तर याचा तुकाराम मुंढे यांच्या पावलावर पाऊल ठेवत बीड जिल्ह्यातील बरेच तरुण एमपीएससी पास करून आता जिल्ह्याचे नाव रोशन करताना पाहायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यातील दोन मुलीने व दोन मुलांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागात शिक्षण झाल्यानं स्पर्धा परीक्षेची माहीती नव्हती. काही सिनिअर विद्यार्थांनी माहीती दिली. मग ठरवलं परीक्षा देऊ. दोन वर्षांपूर्वी अभ्यासाला सुरुवात केली. एमपीएससी ची जाहिरात पण आली आणि परीक्षाही झाली. मधेच लॉकडाऊन पडल्यामुळे कोरोना काळामध्ये परीक्षा झाल्याच नाहीत. लॉकडाऊन नंतर दोन परीक्षा झाल्या.त्याचा रिझल्ट आत्ता लागला आहे. खरं पाहिलं तर लॉक डाऊनच्या अगोदर मेन्स झाली.
आम्ही सर्वजण गावाकडे आलो. गावाकडे तर काही अभ्यास होत नव्हता. पण जेवढा होईल तेवढा अभ्यास केला. नंतर अभ्यासासाठी पुण्यात गेली. याच काळात एक वर्ष प्रॅक्टिस केली. पण परीक्षा झाली नाही व नंतर पुन्हा लॉकडाऊन आणि शेवटी 2021ला ग्राऊंड झालं. 2022 ला याचा रिझल्ट लागला या रिझल्ट मध्ये मुलींमध्ये माझी सातवी रँक आहे, असं कोमल उबाळे म्हणाली.
मला मुलीला शिकवताना अनेक अडचणी आल्या शेती आहे पण त्याच्या मधून उत्पन्न निघत नाही. शेती थोडी आहे व जिरायती आहे. त्यामुळे पैशाच्या अनेक अडचणी आल्या आहेत.मुलीला शिकवणा मागचा एकच उद्देश आहे. मुलगा आणि मुलगी समान हे धरले पाहिजेत मला एकूण चार मुली आहेत. बाकीच्या तीन मुलींचे लग्न केली आहेत .त्याही मुलींचे लग्न मी अठरा वर्ष झाल्यानंतरच लग्न केले आहेत. ही शेवटची चार नंबरची मुलगी आहे. या मुलींना भरपूर कष्ट केला आहे. आणि आमचा फॅमिलीचा पूर्ण तिला पाठिंबा होता. लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस आम्ही तिला खचू न देता तिला पाठिंबा दिला. धैर्य वाढवण्याचं काम आम्ही केला आहे. परीक्षा पुढे ढकलल्या मुळे तिला काहीही करता येत नव्हतं. त्यावेळी परिस्थिती तशी होती. परीक्षा जरी पुढे टाकल्या तरी आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे .लॉकडाउन मध्ये मुलीची तब्येत बरोबर नसायची पैसे पाठवायचे ही अडचण यायची. मेसची ही अडचण यायची, अशा परिस्थितीमध्ये ही तिने दिवस काढून अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे तिला हेच मिळालं आहे, असं पालक नवनाथ बाबुराव उबाळे म्हणाले.
``मला घरच्यांचा मोठा सपोर्ट होता. आज त्यांच्यामुळेच मी या ठिकाणी आहे. लढाईच्या काळात अनेक मुली अभ्यास करता करता बाहेर पडल्या. कारण त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु माझी फॅमिली माझ्याबरोबर असल्यामुळे मी हा अभ्यास करू शकले. प्रत्येक वेळी त्यांनी मला सहकार्य केलं. एक्झाम नाही झाली तरी त्यांनी मला समजून घेतलं आहे. परिस्थितीच तशी आहे त्यामुळे आपण कोणीही काहीही करू शकत नाही. प्रत्येक वेळेस मला घरच्यांचा सपोर्ट आहे. जर मुलींना शिकण्याची इच्छा आहे. तिने शिकलंच पाहिजे परिस्थिती तर प्रत्येकासमोर होत असते. अठरा वर्षाच्या आत मुलींचे लग्न करत आहेत. तर जो कायदा अठरा वर्षाच्या आतील मुलींचे लग्न करत आहेत अशांसाठी माझे प्रयत्न राहणार आहेत की त्यांचे लग्न अठरा वर्षाच्या आत होणार नाही, असं कोमल उबाळे म्हणाल्या.
चांगलं झालं पास झाली, मार्क चांगले घेतले आहेत. चार मुली आहेत. शिकवता शिकवता तारांबळ होती. पैसे कुठून यायचे आहेत. आम्ही सगळं पाठी राहून मुलीचं शिक्षण केलं. मुलीला योग्य मार्गाला पाठवलं.तिला एकही रुपया कमी पडू दिला नाही. आमचं काहीही असु नसु कसेही दिवस काढले. ती परीक्षेची तयारी करीत होती तिला आम्ही पैसा पुरविला. शेतीत काम तर भरपूर आहेत. शेतीत कामच करावे लागत नाहीय पिकले तरी शेतात कामच करावे लागते जर काही दिवस पाऊस नाही आलं तर शेतातलं पीक वाळून जातं. पुन्हा पाऊस आला तर पुन्हा ताजं होतं तसं पाहिलं तर आमच्याकडं शेतीला पाणी नाही. आम्हाला मुलीला शिकवताना भरपूर अडचणी आल्या. सर्व गोष्टी मागे टाकून आम्ही तिला शिकवलं लोकांच्या इथ रोज जाने जा मजुरी करून आम्ही तिचं शिक्षण केलं.
मजुरी करून जे पैसे येतील तिला आम्ही पाठवत राहायचो. तिची इच्छा पूर्ण करायची होती. शेतीमध्ये उत्पन्न निघत नाही शेती कोरडवाहूच आहे. त्यामुळे न शाश्वत उत्पन्न निघत नाही. आमच्याकडे विहीर नाही बोर नाही तर विहिर खोदली तर तिला पाणी लागत नाही. मुलगी शिकली तिनं गावाचं नाव केलं. देशात नाव केलं खेडेगावात ग्रामीण भागात सर्वांना माहीत झालं की आमची मुलगी एमपीएससीची परीक्षा पास झाली आहे. आम्हाला राहण्यासाठी साधं घरही व्यवस्थीत नाही रानात गेले तर रानात प्यायला पाणी नाही. पाणी धरून न्यावं लागतं आता मला तिची इच्छा पूर्ण करायची होती, असं कोमलची आई नंदूबाई उबाळे म्हणाल्या.
बहीण एमपीएससी पास झाली. सर्व फॅमिलीला आनंद झाला. असं शिकवलं हे फक्त फॅमिलीला आणि त्याच्या कुटुंबालाच माहीत असतं. कितीही अडचण आली तरी आम्ही त्याच्यावर मात करत सर्व शिक्षण पूर्ण केलं. सर्व फॅमिली तिला सपोर्ट केला. असंच ग्रामीण भागातील मुलांनी आणि मुलींनी आपल्या बीड जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील मना मुलांनी आपलं नाव व आपल्या गावाचं नाव उज्वल करावं व माझ्या बहिणीचा आदर्श घेऊन त्यांनी परीक्षेला सामोरं जावं व त्यांना माझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा मुलीचा भावाने कोमलला दिल्या आहेत.