Home > मॅक्स रिपोर्ट > कुपोषण मुक्तीसाठी समन्वय समितीचा महत्वपुर्ण पुढाकार...

कुपोषण मुक्तीसाठी समन्वय समितीचा महत्वपुर्ण पुढाकार...

कुपोषण मुक्तीसाठी समन्वय समितीचा महत्वपुर्ण पुढाकार...
X

सुधागड तालुक्यात तब्बल 80 बालके कुपोषीत असल्याचे निदर्शनास आले. सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक पाली सुधागड तहसिलकार्यालयातील हिरकणी कक्षात दि.(29) गुरुवारी पार पडली. या बैठकीत महिला व बालकल्याण विभागामार्फत तालुक्यात 80 कुपोषित बालके असल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. यामुळे प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनासमवेत समन्वय समिती व जागरुक नागरीकांच्या सहकार्याने सुधागड तालुका शंभर टक्के कुपोषणमुक्त करणार असल्याचा निर्धार समन्वय समितीचे अध्यक्ष राजेश मपारा यांनी व्यक्त केला. याकरीता परिपुर्ण नियोजन व प्रसंगी स्वखर्चाने कृतीशिल काम करणार असल्याचे देखील समन्वय समितीच्या बैठकीत सर्वानुमते ठरले.

Updated : 30 Nov 2018 3:57 PM IST
Next Story
Share it
Top