Home > मॅक्स रिपोर्ट > धक्कादायक! भाजपच्या शहराध्यक्षाकडून विवाहितेचा विनयभंग

धक्कादायक! भाजपच्या शहराध्यक्षाकडून विवाहितेचा विनयभंग

धक्कादायक! भाजपच्या शहराध्यक्षाकडून विवाहितेचा विनयभंग
X

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या शहराध्यक्षांनी विवाहितेचा विनयभंग केल्याचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संजय यादव हे आरोपीचे नाव असून ते भाजपचे युवा शहराध्यक्ष आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की संजय यादव हा गेल्या अनेक वर्षापासून भाजपाचा सक्रिय सदस्य आहे. तो सध्या भाजप युवा मोर्चाचा शहराध्यक्ष आहे. यादव याने शहरातील २८ वर्षीय वयाच्या विवाहितेला ३१ डिसेंबरच्या रात्री फोन केला. तू मला फार आवडतेस. तुझा पती आता घरी नाही. मग मी घरी येऊ का? अशी विचारणा केली तसेच लज्जास्पद वक्तव्य केले. सदर विवाहितेने याबाबत कुणाला सांगितल्यास तिच्या पतीस खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देखील दिली.

या प्रकरणी त्या विवाहितेने श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या संबंधित संजय यादवच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु तक्रार नोंदवल्याचे समजताच तो शहरातून पसार झाला. पोलीस संजय यादवचा शोध घेत आहेत.

Updated : 2 Jan 2019 6:10 PM IST
Next Story
Share it
Top