Home > मॅक्स रिपोर्ट > रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात लॉकडाऊन

रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात लॉकडाऊन

राज्याभिषेक सोहळ्याला जाण्याचं नियोजन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा...

रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात लॉकडाऊन
X

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक किल्ले रायगडावर दरवर्षी 6 जूनला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 6 जूनला आलेले शिवप्रेमी पाचाड गावामध्ये थांबत असतात. मात्र, सलग दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम शासनाच्या नियमावलीत राहून साजरे केले जातात. यावर्षी वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने टाळे बंदी लावली आहे.

गावात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने ग्रामस्थांनी हा निर्यय घेतला असुन यामध्ये शासनाच्या नियमाच्या अधिन राहून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व हॉटेल, लॉजिंग व्यवसाय पुर्णपणे बंद केले आहेत. त्याला परीसरातील ग्रामस्थ आणि व्यावसायीकांनी सकारात्मक प्रतिसाद देत व्यवसाय बंद केले आहेत.

6 जुनला शिवराज्याभिषेकदिन सोहळा आहे. युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 6 जूनला किल्ले रायगडावर येण्याचे शिवप्रेमींना अवाहन केले आहे. यामुळे पाचाड गावातील टाळे बंदी वादाचा मुद्दा ठरणार आहे. गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी टाळे बंदीचा निर्णय घेतला आहे. शिवप्रेमींनी सहकार्य करावे असे आवाहन पाचाड ग्रामस्थांनी केले आहे.

Updated : 3 Jun 2021 11:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top