पुतण्याच्या हातून शरद पवारांची 'हिट विकेट', मोदींचं पवारांवर टीकास्त्र
Max Maharashtra | 1 April 2019 1:29 PM IST
X
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील प्रचारसभेत कॉंग्रेसपेक्षा शरद पवारांवर निशाणा साधला. 'पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत. कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्यासह अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार हे देशात सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक समजले जातात. ते जे काही बोलतात, जे काही करतात, ते-ते विचारपूर्वक करत असतात. अशा शरद पवार यांनी यावेळी निवडणुकीची हवा कोणत्या दिशेला वाहतेय हे लक्षात आल्याने पवारांनी मैदान सोडल्याचं म्हटलंय.
शरद पवारांवर हल्ला चढवताना, मोदींनी अजित पवार आणि शरद पवारांमध्ये आलबेल नसल्याबाबत सुचक इशारा दिला. 'शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली' असं मोदींनी म्हटलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खूप मोठे कौटुंबिक युद्ध सुरू असल्याचा दावा मोदींनी केला आहे. शरद पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहात आहे. असं म्हणत मोदींनी अजित पवार यांचे नाव न घेता. कौटुंबिक युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारांना तिकिटे देण्यात अडथळे येत असल्याचंही यावेळी मोदींनी सांगितलं.
Updated : 1 April 2019 1:29 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire