शरद पवारांनी केलं आदिती तटकरेंच कौतुक
आज महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार 2019’ सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी केले होते. महाराष्ट्रात अशा प्रकारे पुरस्कार सुरु करणारी रायगड जिल्हा परिषद ही पहिलीच जिल्हा परिषद असल्याने शरद पवार यांनी आदिती तटकरे यांच कौतुक केलं.
यावेळी शरद पवारांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार 2019’ देऊन गौरव करण्यात आला.
अर्बन बँक महाडच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई सावंत (सहकार क्षेत्र), माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील (राजकीय) आणि अभिलाषा म्हात्रे ( क्रीडा) यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव केला .
या पुरस्कार सोहळ्याला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, शेकापचे नेते जयंत पाटील आणि आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.