Home > मॅक्स रिपोर्ट > 'स्पा'च्या नावाखाली सेक्स रॅकेट, Just Dialला महिला आयोगाची नोटीस

'स्पा'च्या नावाखाली सेक्स रॅकेट, Just Dialला महिला आयोगाची नोटीस

स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट, Just Dialला महिला आयोगाची नोटीस
X

दक्षिण दिल्लीमधील स्पा संदर्भात चौकशीसाठी Just Dial फोन केला आण त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीच्या फोनवर काही कॉल्स आणि वॉट्सअप मेसेज सुरू झाले. या मेसेज दिल्लीमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटमधील तरुणींचे फोटो होते. हा धक्कादायक प्रकार दिल्ली महिला आयोगाने स्वत: उघड केला आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. "जस्ट डायलवर फोन करुन आम्ही स्पा मसाज संदर्भात खोटी चौकशी केली, त्यानंतर जवळपास ५० मेसेज आले आणि १५० पेक्षा जास्त मुलींचे रेट सांगितले गेले. त्यामुळे महिला आयोगाने आता जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचला नोटीस बजावली आहे. तसेच दिल्ली क्राईम ब्रांचने या सेक्स रॅकेटमध्ये जस्ट डायलची भूमिका काय आहे, याचा तपास कऱण्याचे आदेशही देण्यात आले आहेत."


दिल्लीमधील विविध स्पा मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याच्या अनेक तक्रारी महिला आयोगाकडे आल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून दिल्ली महिला आयोगाने चौकशीसाठी टीम तयार केली. या टीमने जस्टडायल. कॉमला फोन करुन दक्षिण दिल्लीतील स्पाजचे नंबर मागितले. पण त्यानंतर २४ तासांच्या आत महिला आयोगाच्या टीमला १५ फोन कॉल, वॉट्सअप मेसेजेस ज्यामध्ये १५० पेक्षा जास्त तरुणींचे फोटो आणि रेट्स दिले होते. यापैकी एका मेसेजमध्ये एका तरुणीचा फोटो स्पातर्फे पाठवण्यात आला आणि त्यात अश्लील मेसेजही होते. तर दुसऱ्या एका मेसेजमध्ये १४ तरुणींचे फोटो आणि त्यांची माहिती देण्यात आली होती. याचाच अर्थ महिला आयोगाच्या टीमने जेव्हा स्पाची चौकशी केली तेव्हा त्यांची चौकशीची विनंती ही आपोआप सेक्सबाबत गृहीत धरली गेली आणि त्यांना त्या संशयित स्पामधून तातडीने संपर्क साधला गेला.

यानंतर महिला आयोगाने तातडीने दिल्ली क्राईम ब्रांचला fir दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जस्ट डाय़लच्या व्यवस्थापनालाही नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या स्पाची पार्श्वभूमी तपासण्याच्या धोरणाबद्दल स्पष्टीकरण देण्याचे आदेशही आयोगाने जस्ट डायलला दिले आहेत. ही सर्व प्रक्रिया १२ नोव्हेंबरच्या आत पूर्ण कऱण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाने मात्र दिल्लीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Updated : 9 Nov 2021 2:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top