बैलगाडा शर्यतींमधील अपघात रोखणारा नवा पॅटर्न
X
रायगड : सुप्रीम कोर्टाने 8 वर्षापासून लावलेली बैलगाडा शर्यतींवरील बंदी हटवल्यानंतर संबंध महाराष्ट्रात आता बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात आहेत. मात्र या शर्यतींमध्ये होणारे अपघात आजही चिंतेचा विषय आहे. रायगड़ जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा बळी गेल्याने या शर्यतींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले, शिवाय आयोजकांविरोधात गुन्हे देखील दाखल झाले. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन देखील बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाकडे पूर्णपणे लक्ष ठेवत आहे. शर्यतीच्या आयोजनात नियमावली पाळली जातेय का याकडे गांभीर्याने पाहिले जाते आहे.
शिवाय उधळलेले बैल प्रेक्षकांमध्ये शिरकाव करणार नाहीत, किंवा अतिउत्साही प्रेक्षक स्पर्धेवेळी मैदानात येणार नाहीत याकडे आयोजकांनी विशेष लक्ष दिले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बैलगाडा शर्यतीच्या मैदानाच्या दोन्ही बाजूला तारेच्या जाळ्या आणि सुरक्षित कम्पाउंड केले जाते आहे. तसेच बैलगाडा शर्यती प्रेमींना दुरूनच या स्पर्धेचा आनंद लुटण्याचे आवाहन केले जाते आहे.