Home > मॅक्स रिपोर्ट > शाळा पुन्हा सुरु; विद्यार्थ्यांमध्ये 'कही ख़ुशी कही गम'

शाळा पुन्हा सुरु; विद्यार्थ्यांमध्ये 'कही ख़ुशी कही गम'

शाळा पुन्हा सुरु; विद्यार्थ्यांमध्ये कही ख़ुशी कही गम
X

कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा तब्बल दीड वर्षांनंतर सुरु झाल्या आहेत. सोमवारपासून (4 ऑक्टोबर ) राज्यातील शाळांची घंटा वाजली असून, ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या वर्गांना सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे, त्यामुळे दीड वर्षांनंतर शाळेत पाय ठेवणाऱ्या विध्यार्थीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.





औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी या गावातील गेली दीड वर्षांपासून बंद असलेली शाळा सरकराच्या आदेशाने पुन्हा एकदा सुरु झाली असून, विद्यार्थ्यांकडून हातात पेन पेन्सिल घेऊन पुन्हा शिक्षणाचे धडे वहीत उतरवले जातायत. त्यामुळे शाळा सुरु झाल्याचा आनंद मुलांच्या तोंडावर स्पष्ट पाहायला मिळाला.





याच शाळेतील सातवीत शिकणारा प्रसाद गाडेकर बोलतांना म्हणाला की,शाळा सुरू झाल्याचा मला खूप आनंद झाला असून, तब्बल दीड वर्षानंतर मला माझ्या वर्ग मित्रांना भेटता आलंय.पहिला दिवस माझ्यासाठी महत्वाचा ठरला कारण अनेक दिवसांपासून पुन्हा शाळेत जाण्याची वाट पाहत होतो.





तर प्रसादप्रमाणेच इतर विधार्थ्यांमध्ये शाळा सुरु झाल्याचा उत्साहा पाह्यला मिळत आहे. शाळा परत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रीया आहेत, काही विद्यार्थी आनंदी आहेत तर काहींना आता नियमित शाळा नकोशी वाटतेय




त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांमध्ये उत्साहा पाहायला मिळत आहे.


विद्यार्थी अभ्यास विसरले

तब्बल दीड वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा घरूनच अभ्यास करावा लागत होता. तर ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाबाबत मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याने मुलांचे अभ्यास होऊ शकले नाही. परिणामी विद्यार्थी मागील अभ्यास विसरले असल्याचं शिक्षक सांगतायत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा मागचे धडे देण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

Updated : 7 Oct 2021 3:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top