निसर्गावर मात करणारा शेतीचा सावळज पॅटर्न
सांगली जिल्ह्यातील सावळज येथील शेतकऱ्यांच्या यशाची यशोगाथा ; निसर्गावर मात करून घेतला विक्रमी दर सावळज पॅटर्न राबवणे काळाची गरज पहा राजाराम सकटे यांचा स्पेशल रिपोट फक्त मॅक्स महाराष्ट्रावर ....
X
सांगली जिल्ह्यातील तासगाव पासून अवघ्या वीस किलोमीटरवर असलेले सावळज हे गाव आहे.येथील शेतकऱ्यांने काळाची पाहुले ओळखून नवीन शकलं लढवली आहे.सावळज येथील अंकुश माळी यांनी द्राक्षे शेतीमध्ये राभिवलेला पटर्न हा शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणारा आहे. मात्र हा पटर्न खर्चिक आहे. तर वारंवार होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करण्यासाठी हा पटर्न फायदेशीर ठरणार आहे.
तर अंकुश माळी यांनी आगाप छाटणी घेतल्याने त्यांचा चालू वर्षीचा यंदाचा हंगाम सुरू झाला आहे. सावळज येथील प्रयोगशील द्राक्ष बागायतदार अंकुश सदाशिव माळी यांच्या द्राक्ष बागेतून द्राक्ष काढणीस सुरुवात झाली आहे. त्याच्या द्राक्षना विक्रमी असा प्रति किलो एकशे चार रूपये असा भाव मिळाला आहे.त्यामुळे यंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली झाली असल्याचे समाधान बागायत दारातून व्यक्त होत आहे.निसर्गाची अनिमित्ता व वातावरणातील होणारे बद्दल यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होताना प्रत्येक वर्षी आपण पाहतो मात्र सावळज येथील शेतकऱ्यांने मात्र निसर्गावर मात करत उत्तम उत्पन्न घेऊन चांगला दर मिळवला आहे.
तासगाव तालुका हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो. अनेक बागायतदार प्रगतिशील असले तरी बरेच जण प्रयोगशील आहेत. आपाआपल्या द्राक्ष बागेत ते वेगवेगळे प्रयोग करीत असतात. हंगामाच्या काही दिवस अगोदर द्राक्षे बाजार पेठेत विक्रीसाठी आली तर चांगला दर मिळून बागायत दाराना चांगले पैसे कसे मिळतील या दृष्टीने वेग वेगळे प्रयोग राबवीत असतात.या उद्देशाने अंकुश माळी हे दरवर्षी आगाप छाटणी घेतात.त्यांनी आपल्या शेतीत सुपर सोनाक्का या वाणाची लागण केली आहे.सुरुवातीचे एक दोन वर्षे त्यांनी नियमित पणे द्राक्ष छाटणी घेतली पण अपेक्षित उत्पन्न येऊन ही द्राक्षना अपेक्षित दर मिळाला नाही त्यामुळे त्यांनी आगप छाटणी घेण्याचे ठरवून त्या दृष्टीने नियोजन केले. माळी याची शेती बसवेश्वर नगर रस्त्यावर आहे.
त्यांनी आपल्या दिड एकर क्षेत्रावर आगप छाटणीचा प्रयोग सुरू ठेवला आहे. द्राक्ष बागेसाठी त्यांनी वाय आकाराचा मंडप घालण्यात आला आहे.दीड एकर क्षेत्रातील सर्व द्राक्ष वेलीवर ( बागेवर) त्यांनी प्लास्टिक कागदाचे आच्छादन केले.त्यासाठी त्यांनी इस्राईल येथून प्लास्टिक कागद आयात केला आहे. प्लस्टिक कागद आणि तो आच्छादना साठी माळी याना सुमारे सात लाख रुपये खर्च आला आहे. माळी यांनी दि २० जुलै रोजी द्राक्षाची आगाप छाटणी घेतली होती. यावर्षी सुरुवाती पासून अत्यंत प्रतिकूल परिस्तिथी असतांना आणि गेल्या वर्षी द्राक्ष बागायतदारांना आलेला कठीण आणि वाईट अनुभव असूनही माळी यांनी वेगळा प्रयोग करून धाडस केले.
या वर्षी द्राक्ष पिकाच्या संगोपनासाठी सुमारे तीन लाख रुपये औषधे मजुरी खते असा खर्च झालेला आहे. प्रतिकूल हवामान असतानाही लांब सडक,दर्जेदार अशी द्राक्षे तयार केली आहेत.प्रत्येक द्राक्ष वेलीस अडीच पेटी (दहा किलो )चे उत्पादन मिळत आहे.. दीड एकर क्षेत्रात सुमारे दोन हजार द्राक्षवेली आहेत.यातून सुमारे २० लाख रुपये अंदाजे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. बांगला देश बाजारपेठेतील द्राक्ष व्यापारी सुदाम माने ( रा, भैरववाडी चिंचणी) यांनी माळी याची द्राक्षे खरेदी केली असून त्यांनी द्राक्ष काढणी सुरू केली आहे.द्राक्षे काढणी करून ती क्रेट मध्ये पॅकिंग करून पाठवली जात आहेत.माळी याच्या द्राक्ष बागेतून या पूर्वी सलग दोन वर्षे तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगामाची सुरुवात झाली आहे. या वर्षी अत्यत प्रतिकूल परिस्तिथी असताना माळी यानी द्राक्ष पिकाचे निकोप आणि दर्जेदार उत्पादन घेतले आहे.हंगाम शुभारभाचा मान या वर्षीही त्यांना च मिळाला असल्याने त्यांनी आगप उत्पादनात हॅट्ट्रिक केली आहे. तर एकीकडे ऑक्टोंबर महिन्यात छाटणी घेतलेल्या बागायदारांचे मोठे नुकसान समोर येत आहे.
जिह्यातील 65 हजार एकर द्राक्षबागा उद्ध्वस्त 70 टक्के नुकसान : ढगाळ हवामान, पावसाने द्राक्षउत्पादक हतबल; घडकूज, मनीगळ, दावण्या रोगाचा प्रार्दृभाव सांगली जिल्ह्यांत आठवडाभरापासून सलग ढगाळ हवामान आणि पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील 80 हजार एकरांपैकी तब्बल 65 हजार एकरावरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. घडकूज, मनीगळ, डाऊनी रोग यामुळे यंदाही द्राक्षबागायतदारांना संकटात टाकले आहे. फुलोरा अवस्थेत असणार्या 65 हजार एकरांवरील द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून 70 टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे.
गतवर्षीच्या हंगामात आगाप पीक छाटणी घेतलेल्या शेतकर्यांना खराब हवामानामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी बहूतांश शेतकर्यांनी आगाप छाटणी घेतली नाही. जिल्ह्यात 79 हजार 440 एकर क्षेत्रावर द्राक्षबाग आहे. त्यापैकी सुमारे 65 हजार एकरांवरील द्राक्षबागांची छाटणी ऊशीराने केल्या. मात्र यावर्षी निसर्गाने ऊशीराने पीक छाटणी करणार्या शेतकर्यांना पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ हवामानासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे फुलोरा अवस्थेतील, तसेच 1 नोव्हेंबरपर्यंत पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सततच्या खराब हवामानामुळे फुलोरा अवस्थेत असणार्या द्राक्षघडांची कुज आणि मनीगळ मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक बागांना डाऊनी रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळ लाखो रुपये खर्च करून हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे.
65 हजार एकरांवरील द्राक्षबागांचे 70 टक्क्यांपर्यंत नुकसान आतापर्यंत झाले आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार पुरते उध्दवस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. उरलेली द्राक्षबाग वाचवण्यासाठी महागड्या औषधांची दिवसरात्र फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. मात्र आणखी चार दिवस ढगाळ हवामान राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.यामुळे द्राक्षबागायतदारांचा "जीव टांगणीला लागला आहे".
ढगाळ हवामान आणि पाऊसामुळे पांढर्यामुळीची वाढ थांबते. पीक छाटणीनंतर फुलोरा अवस्थेत असणार्या द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. 35 ते 40 दिवसांच्या स्टेजमध्ये एसएसएन, सोनाक्का, सुपर माणिक चमन या जातींच्या द्राक्षांत नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. पीक छाटणीनंतर पंधरा दिवसांनी झिंक, बोरॉन, मिथाईलची फवारणी केली असल्यास फुलोरा अवस्थेत नुकसान टाळता येवू शकते. जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला जात असून नुकसानग'स्त शेतकर्यांना फळ वीमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.आठ दिवसांपासून हवामान खराब आहे. आणखी चार दिवस खराब हवामान राहणार आहे. फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांना सद्यस्थितीत घडकुज, मनीगळ होवू नये, यासाठी कोणतेच उपाय नाहीत. पीक छाटणीनंतर पंधरा दिवसांनी गतीरोधक औषधांची फवारणी केली असल्यास नुकसान कमी होवू शकते. सद्यस्थितीत शास्त्रज्ञ, तज्ज्ञांचा सल्ला घेवून औषघ फवारणी करणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील तालुकानिहाय द्राक्षक्षेत्र(हेक्टरमध्ये) :
खानापूर : 1125,कवठेमहांकाळ : 2871,कडेगाव : 229,पलूस : 1561,तासगाव : 9236,मिरज : 8268
जत : 6906,वाळवा : 1215,आटपाडी : 365,एकूण : ३१७७६