खंडोबाराया करणार भाजपाचा खेळखंडोबा- सक्षणा सलगर
X
मराठा समाजाच्या आरक्षणानंतर धनगर समाजानेही आरक्षणाची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिलं मात्र केंद्राकडे धनगर समाजाच्या आरक्षण मागणी राज्यसरकारने केलीच नव्हती. यावरुन राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. सत्तेत नसताना धनगर समाजाचा भाजपाला पुळका होता. धनगर समाजाला आरक्षण देणार, असे सांगत भाजपाने सत्ता काबीज केली़, मात्र गेल्या चार वर्षांत भाजपा सरकारने धनगरांची उपेक्षाच केली. तुम्हाला धनगर समाजाने आरक्षणासाठी मते दिली होती़, पण तुम्ही धनगर समाजाचा विश्वासघात केला, माळेगावचा जागृत खंडोबाराया तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अशी आक्रमक तोफ डागत धनगर समाजाच्या आक्रमक नेत्या आणि राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी धनगर आरक्षणावरून भाजपा सरकारला लक्ष्य केले माळेगाव येथील खंडोबारायाच्या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धनगर आरक्षण ललकार महामेळाव्यात त्या बोलत होत्या. भाजपाने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याने माळेगाव येथील खंडोबाराया येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.