Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : नालेसफाईच्या टेंडरची प्रतिक्षा, नागरिकांचा जीव टांगणीला

Ground Report : नालेसफाईच्या टेंडरची प्रतिक्षा, नागरिकांचा जीव टांगणीला

Ground Report :  नालेसफाईच्या टेंडरची प्रतिक्षा, नागरिकांचा जीव टांगणीला
X

मे महिना आता संपत आला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये नालेसफाईची काम पूर्ण होत असल्याचे दावे तिथले सत्ताधारी आणि प्रशासन करत आहे. पण उल्हासनगरमध्ये मात्र नालेसफाई तर सोडाच पण नालेसफाईचे टेंडरच निघाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आताही निविदा जरी काढली तरी टेंडर प्रक्रिया होऊन ठेकेदार निश्चित होईपर्यंत 5 ते 8 दिवस लागण्याची शक्यता इथले नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उल्हासनगर महापालिका कुठल्या नाल्यांची सफाई करणार आहे असाही प्रश्न आता इथले लोक विचारु लागले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात ज्या नाल्यांच्या आणि नद्यांच्या काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरते तिथल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती आहे. इथल्या परिस्थितीचा थेट आढावा घेणारा किरण सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...


Updated : 26 May 2022 6:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top