Home > Election 2020 > लाव रे तो...नंतर मनसेचं दाखव रे ते फोटो

लाव रे तो...नंतर मनसेचं दाखव रे ते फोटो

लाव रे तो...नंतर मनसेचं दाखव रे ते फोटो
X

मनसेने लोकसभा निवडणूकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून सत्ताधा-यांचं धाबं दणाणून सोडलं. मात्र, राज्यातील लोकसभा निवडणूक संपली तरी मनसेने आपला खाक्या सोडलेला दिसत नाही. मनसे अधिकृत २४ नावाच्या एका पेजवरून गडचिरोलीतल्या शहिदांची छायाचित्रे म्हणून जूनी छायाचित्रे वापरण्यात आली असल्याचे दाखवत भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून यावर हल्ला चढवला आहे. मात्र, मनसेने सदर पेजशी आपला संबंधन नसल्याचे सांगत भाजपावर प्रतिहल्ला चढवताना भाजपाने दिल्लीतील प्रचारादरम्यान वापरलेल्या फोटोंची पोलखोल केल्याने आता मनसे दाखव रे फोटो म्हणणार का अशी चर्चा नेटिझन्समध्ये रंगलीय.

मनसेवर टिका करणारे काय होते भाजपाचे ट्विट

निवडणुका संपल्या तरी मनसेचा खोट्या आणि बनावट फोटो आणि व्हिडिओचा स्पॉन्सर्ड धंदा संपलेला दिसत नाही. वस्तुतः ऑक्टोबर २०१७ चे अरुणाचल प्रदेशमधील फोटो वापरून हे फोटो गडचिरोली शहिदांचे म्हणून पसरवले जात आहेत. त्यांना याची लाज वाटली पाहिजे. हे फोटो अरुणाचल प्रदेशमधील असून यापूर्वी सुद्धा सरकारची बदनामी करण्यासाठी वापरले गेले आहेत. याच्या अनेक लिंक गुगलवर उपलब्ध आहेत. ज्या १५ जवानांनी गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात प्राण गमावले, त्यांचा अपमान करण्याचा हा अतिशय घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार प्रकार आहे.

सरकारची खोटी बदनामी करताना किमान शहिदांचे आणि त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे भान ठेवले, तर ते अधिक बरे राहील, हे आमचे सर्वांना विनम्र आवाहन आणि विनंती आहे.

भाजपाच्या ट्विटला मनसेचे प्रत्युत्तर

खोटं पसरवण्याच्या संसर्गजन्य रोगातून @BJP4Maharashtra लवकर बरे होईल, हीच सदिच्छा!

तुम्ही पक्षाशी कोणताही संबंध नसलेल्या अनधिकृत पेजचा दाखला दिलात आता हा घ्या भाजपाच्या अधिकृत खात्यावरून केल्या गेलेल्या खोट्या प्रचाराचा दाखला. भाजपाने दिल्ली पालिकेत एलईडी दिवे लावल्याचे फोटो प्रसिद्ध केले असून हे फोटो वस्तुतः शेलबर्न येथील असल्याचा दावा मनसेने या ट्विटच्या माध्यमातून करीत भाजपावर खोटारडेपणाचा आरोप करीत प्रतिहल्ला चढवला आहे.

त्य़ामुळे आता भाजपाने विविध ठिकाणी वापरलेल्या फोटोंची सत्यता तपासत मनसे ये दाखव रे तो व्हिडिएओ म्हणणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.

Updated : 4 May 2019 6:15 PM IST
Next Story
Share it
Top