राज ठाकरेंच्या सर्वाधिक प्रचारसभा राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी ?
X
गेल्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सबंध पाहता राज ठाकरे लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार करणार अशी चर्चा सुरु आहे. आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे हे महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. मात्र, या सभा महाआघाडीच्या व्यासपीठांऐवजी स्वतंत्र व्यासपीठांवर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी मतांचे विभाजन होऊन भाजप शिवसेनेला फायदा होऊ नये म्हणून लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज भाजप – शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी राज्यभरात ८ ते ९ सभांचं नियोजन करण्यात आल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिलीय. राज ठाकरेंच्या सभा या महाआघाडीच्या व्यासपीठावर होणार नसून मनसेकडूनच स्वतंत्ररित्या सभा घेण्यात येणार आहेत. दरम्यान, यंदाही मनसेकडून शिवाजी पार्कवर गुढी पाडव्यानिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे निवडणुकांतील प्रचारसभांविषयी अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात होणार राज ठाकरेंच्या प्रचारसभा?
पश्चिम महाराष्ट्र
सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)
सोलापूर - सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
पिंपरी-चिंचवड - पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
मराठवाडा
नांदेड - अशोक चव्हाण (काँग्रेस)
उत्तर महाराष्ट्र
नाशिक – समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस)
कोकण
ठाणे- आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेस)
मुंबई
उत्तर मुंबई - ऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
ईशान्य मुंबई - संजय दीना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त (काँग्रेस)