Home > News Update > स्मृती इराणी अपशब्द प्रकरणी कवाडेंना अटक आणि सुटका

स्मृती इराणी अपशब्द प्रकरणी कवाडेंना अटक आणि सुटका

स्मृती इराणी अपशब्द प्रकरणी कवाडेंना अटक आणि सुटका
X

'स्मृती इराणी नितीन गडकरींसोबत राज्यघटना बदलण्यासंबंधी चर्चा करतात. मी तुम्हाला स्मृती इराणींबद्दल सांगतो. त्या आपल्या कपाळावर मोठं कुंकू लावतात. पण सतत पती बदलवणाऱ्या महिलांच्या कपाळावरचं कुंकूही वाढतच राहतं असं मी ऐकलंय', असं वादग्रस्त वक्तव्य रिपाइंचे (कवाडे) नेते जयदीप कवाडे यांनी नागपूरच्या सभेत केलं होतं. याविरोधात भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर जयदीप यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव असलेल्या जयदीप यांच्याविरोधात निवडणूक अधिकारी मदन सुबेदार यांनी लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली होती. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कलम ५०० अंतर्गत मानहानी, अपशब्द वापरल्यानं कलम २९४ आणि निवडणुकीसंदर्भात खोटं बोलल्याचा आरोप करत कलम १७१ नुसार जयदीप यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदवला गेलाय.

Updated : 4 April 2019 3:21 PM IST
Next Story
Share it
Top