प्रियंकाच्या ट्रोलर्सनो सावधान!
Max Maharashtra | 5 Feb 2019 1:00 PM IST
X
X
प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यामुळे तसेच काँग्रेस पक्षाने त्यांना सरचिटणीस पद दिल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी प्रियंका गांधीविरोधात गलिच्छ आणि अश्लील भाषेचा वापर करत आहेत. याविषयी मॅक्समहाराष्ट्रने सर्वात प्रथम बातमी केली होती. सोशल मीडियावर अश्लील, अपशब्द वापरून प्रियंका गांधींना ट्रोल केल जात आहे म्हणून काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. चारूलता टोकस यांनी महाराष्ट्र सायबर पोलीस कार्यालयात तक्रार अर्ज केला आहे, तसेच राज्य महिला आयोगाकडे सुद्धा ४ फ्रेब्रुवारीला कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज सादर केला आहे.
maxmaharashtra
या तक्रार अर्जात पोलीस प्रशासन व सायबर पोलीसांनी लवकरात लवकर गुन्हा नोंदवून संबंधीत गुन्हेगारास अटक न केल्यास महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी रसत्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील असा इशारा टोकस यांनी दिला आहे.
maxmaharashtra
दरम्यान मॅक्समहाराष्ट्रने प्रियंका गांधींना सोशल मीडियावर कशापद्धतीने ट्रोल केलं जात आहे याची बातमी केली होती…वाचा ही बातमी https://goo.gl/KPphKX
Updated : 5 Feb 2019 1:00 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire