Home > Election 2020 > पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे लातूर मध्ये एकाच मंचावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे लातूर मध्ये एकाच मंचावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे लातूर मध्ये एकाच मंचावर
X

युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या तू-तू मै मै नंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लातूर जिल्ह्यातील औसा येथे संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. साधारण सकाळी 11:30 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे.

दोन पक्षाचे शिर्षस्थ नेते एकाच मंचावर येत असल्याने साधारण दीड लाख लोक एकत्र येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाला पाण्याची बॉटल, बॅग किंवा इतर काहीही वस्तू आत नेण्यास मनाई केली आहे. मात्र, युती झाल्यानंतरही सामनातून मोदी सरकारवर टीका थांबलेली नाही. त्यामुळे आज नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असताना उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे

Updated : 9 April 2019 10:44 AM IST
Next Story
Share it
Top