Home > मॅक्स रिपोर्ट > KPMG Report: कोरोनाचे संकट आणि बांधकाम उद्योग – भाग 4

KPMG Report: कोरोनाचे संकट आणि बांधकाम उद्योग – भाग 4

KPMG Report: कोरोनाचे संकट आणि बांधकाम उद्योग – भाग 4
X

कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या विविध क्षेत्रांवर त्याचा कसा परिणाम होणार आहे याचा आढावा जागतिक स्तरावर काम करणाऱ्या KPMG या फर्मने घेतला आहे. विविध देश, सार्वजनिक कंपन्या, मोठमोठे उद्योग यांना अर्थविषयक मार्गदर्शन करणाऱ्या KPMG या फर्मच्या अहवालानुसार आपण चौथ्या भागात पाहणार आहोत बांधकाम उद्योगापुढील आव्हानं

उद्योगाचा थोडक्यात आढावा

  • बांधकाम उद्योगातून भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. एवढेच नाही तर बांधकामाशी संबंधित सुमारे २५० उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. २०२५ पर्यंत बांधकाम उद्योगाचे देशाच्या विकासदरातील योगदान १३ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तर २०३०पर्यंत जागतिक पातळीवर १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची उलाढाल कऱणारा जगातील तिसरा सगळ्यात मोठा उद्योग म्हणून भारताच्या बांधकाम क्षेत्राकडे पाहिले जाते.
  • गेल्य़ा आर्थिक वर्षात ५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक मिळवूनही २०१९ हे वर्ष भारतीय बांधकाम उद्योगासाठी संमिश्र ठरले. यातील ६६ टक्के गुंतवणूक ही व्यावसायिक बांधकाम क्षेत्रात केली गेली. याचे कारण म्हणजे स्थिर आणि चांगले भाडे मिळवून देणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांकडून पैशाची मोठी मागणी होती.
  • दुसरीकडे रहिवासी बांधकाम क्षेत्रात गेल्या वर्षातील आर्थिक मंदी, बँकेतर वित्तीय संस्थांचे वाद, बिल्डर्सची थकीत देणी आणि ग्राहकांची मानसिकता यामुळे घरांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे अनेक शहरांमध्ये तयार घरं पडून आहेत.
  • सरकारनं रखडलेल्या १६०० बांधकाम प्रकल्पांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी २५ हजार कोटींचा विशेष निधी दिला. त्यामुळे बांधकाम क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित इतर क्षेत्रांमध्येही तेजी येईल अशी अपेक्षा होती.

उदयोगावरील सध्याचा आणि दीर्घकालीन परिणाम

  • नवीन घरांच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता असून नवीन प्रकल्पांची संख्याही घटण्याचा अंदाज आहे.
  • अमेरिका आणि युरोपमधील संभाव्य मंदीमुळे व्यावसायिक बांधकामांची सध्या असलेली मागणी कमी होण्याची शक्यता किंवा या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात ही मागणी वाढण्याची शक्यता.
  • लॉकडाऊनमुळे देशातील किरकोळ व्यापार क्षेत्रावर परिणाम झाला असून येत्या काळातही पुरवठा आणि वाहतूक विस्कळीत झाल्याने या क्षेत्रातही मंदीची शक्यता आहे.
  • कोरोनाच्या महासंकटाचा सगळ्यात आधी फटका बसलेल्या क्षेत्रांपैकी आदरातिथ्य क्षेत्र एक आहे. या क्षेत्रात मोठं आर्थिक नुकसान आणि रोजगार जाण्याची शक्यता आहे.
  • औद्योगिक(लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसेस) क्षेत्रावरही मोठा परिणाम होणार आहे. पण चीनमधील गुंतवणुकीसंदर्भातील जोखीम कमी झाली तर या क्षेत्रात मोठी तेजीही येऊ शकते.
  • बांधकाम क्षेत्रातील निधी व्यवस्थापन आणि निधीची चणचण कमी करण्यासाठी या वर्षी प्रस्तावित असेलला REIT (Real Estate Investment Trust) पुढे ढकलला जाण्याची शक्यता. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात पुन्हा निधीची चणचण निर्माण होणार.
  • सर्वच क्षेत्रांना मोठा धक्का बसला असल्याने बांधकाम क्षेत्रात नव्यानं होणारी गुंतवणूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

बांधकाम क्षेत्रासाठी काही शिफारशी

कर आकारणी – रहिवासी बांधकाम प्रकल्पांना ६ महिन्यांपर्यंत उशीर झाल्यास RERA कायद्यातून सवलत देण्यात यावी.

पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला वर्षभरासाठी जीएसटी माफ करण्यात यावा

उद्योगावरील आर्थिक तणाव दूर कऱण्य़ासाठी

  • विकासकांना ३ महिन्यांपर्यंत व्याज आकारु नये. त्यानंतर ही मुदत ३ महिन्यांपर्यंत वाढवण्यात यावी
  • विकास प्रकल्पांसाठी देण्यात येणारे कर्ज कमी व्याजाने देण्यात यावे
  • जास्त अडचणीतील प्रकल्पांच्या कर्जाला अनुत्पादक मालमत्ता ठरवण्यासाठीच्या निकषात ९० दिवसांची मुदत वाढवण्यात यावी
  • पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील मासिक वेतनावर सरकारने अनुदान द्यावे

एकूणच बांधकाम क्षेत्रावरील कोरोना महासंकटाचा होणारा परिणाम हा दीर्घकालीन असण्याची शक्यता आहे. घरांची मागणी वाढावी यासाठी सामान्यांची क्रयशक्ती वाढण्याची गरज आहे.

KPMG Report: कोरोना संकटामुळे येता काळ अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ! – भाग 1

KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कापड-तयार कपड्यांचा उद्योग – भाग 2

KPMG Report: वाहन आणि वाहनांचे सुटे भाग तयार करणारा उद्योग – भाग 3

KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने – भाग 5

Updated : 18 April 2020 3:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top