Home > मॅक्स रिपोर्ट > KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कापड-तयार कपड्यांचा उद्योग – भाग 2

KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कापड-तयार कपड्यांचा उद्योग – भाग 2

KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कापड-तयार कपड्यांचा उद्योग – भाग 2
X

२०१८-१९ मधल्या आर्थिक स्थितीचा विचार करता या २०१९-२० या आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या विविध क्षेत्रांवर त्याचा कसा परिणाम होणार आहे याचा आढावा आपण घेत आहोत, यातील दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत कापड आणि तयार कपड्यांच्या उद्योगापुढीलं आव्हानं

कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तर जागतिक अर्थव्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. पण येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेपुढील आव्हानं काय असतील याचा आढावा संपूर्ण जगातील विविध देशांमधील सरकार, सार्वजनिक कंपन्या, जागतिक उद्योग-व्यवसाय यांचे सल्लागार म्हणून काम करणाऱ्या KPMG या फर्मने घेतला आहे. हा रिपोर्ट मॅक्स महाराष्ट्रवर आम्ही सविस्तरपणे लेख मालिकेच्या स्वरुपात मांडत आहोत, याच मालिकेतील दुसरा लेख

उद्योगाचा आढावा थोडक्यात

उद्योगाचे विकासदर आणि रोजगारातील योगदान· जीडीपीच्या २ टक्के

· २०१८-१९मध्ये ४.५ कोटी नोकऱ्या(थेट नोकरी)

निर्यातीसाठी महत्त्वाची बाजारपेठ· तयार कपडे- अमेरिका, ब्रिटन, कॅनडा,रशिया, UAE,इटली

· कॉटनचा कच्चामाल –बांग्लादेश, कंबोडिया आणि चीन

आयातीसाठीचे महत्त्वाचे देशबांग्लादेश, चीन
एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी या क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण०.७५ टक्के(एप्रिल २००० ते डिसेंबर-२०१९)

उद्योगावरील सध्याचे आणि दीर्घकालीन परिणाम

परिणामकिमानमध्यमकमालअज्ञातटिप्पणी
पुरवठा
प्रमुख कच्च्यामालाच्या किमतीमधील चढउतारकिमती स्थिर राहिल्या पण मागणीवर परिणाम
उत्पादन बंद४.५ कोटी लोकाना रोजगार देणारे सगळ्यात मोठे क्षेत्र आणि कं६टी कामगारांची संख्याही सर्वाधिक.
कामगारलॉकडाऊनमुळे अनेक कारखाने बंद झाल्याने किमान मजुरी मिळणाऱ्या कामगारांचे काम बंद
रोख पैशाच्या उपलब्धतेवरील मर्यादानिर्यातीवरील बंदी,स्वस्त आयात बंद झाल्याने नुकसान
पुरवठा साखळी विस्कळीततयार कपडे उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेची संधी
आयात (लागू असल्यास)कापड उद्योगाच्या कच्चामालासाठीचा चीन भारतासाठी जगातील चौथा महत्वाचा भागीदार आहे

  • पुढचे काही महिने मागणीतील कपातीमुळे भारताच्या कापड उद्योगाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.
  • चीनमधील लॉकडाऊनमुळे कच्च्यामालाचे दर वाढून भारतात त्याचे परिणाम जाणवतील, देशांतर्गत बाजारात काही वस्तुंचे भाव वाढू शकतात.
  • पुढचे काही महिने परिस्थिती अशीच राहिली तर देशांतर्गत किरकोळ बाजारावरही परिणाम जाणवणार
  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटली तर उत्पादन क्षेत्रावर परिणाम होऊन रोजगारावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
  • कापड आणि तयार कपड्यांच्या उद्योगातील उत्पादनाचे प्रमाण एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये १० ते १२ टक्क्यांनी घटण्याची शक्यता.
  • कापसाचे दर ३ टक्क्यांनी घटले आहेत आणि पुढील काही महिन्यात हे दर आणखी घटण्याची शक्यता आहे.

धोरणात्मक निर्णयांची शिफारस

कर – देशभरातील लॉकडाऊनमुळे कर भरण्यासाठीची मुदत वाढवावी लागणार. त्याचबरोबर मागणीतील कपातीमुळे काही कर कमी करण्याचा विचार करता येईल.

आर्थिक तणाव कमी करण्यावर भर – कापड उद्योगावर कोरोनामुळे सध्या आर्थिक ताण आला आहे, त्यामुळे कर्जावरील व्याजदर कमी करता येतील. लघु आणि मध्यम उद्योगांची कर्जावर आधारित पत ठरवण्याच्या निकषांमध्ये बदल करता येईल.

ग्राहकांच्या हितासाठी- करांमध्ये सवलत देऊन ग्राहकांना खर्च करण्यास प्रोत्साहन देता येईल

इतर – इतर देशांमध्ये जाहीर कऱण्यात आलेल्या पॅकेजेसच्या धर्तीवर आर्थिक पॅकेजचा विचार करता येईल. उद्योगांवर आकारण्यात आलेले काही कर, दंड किंवा शुल्क यांचा परतावा देता येईल का याचाही विचार होऊ शकतो.

KPMG Report: कोरोना संकटामुळे येता काळ अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ! – भाग 1

KPMG Report: वाहन आणि वाहनांचे सुटे भाग तयार करणारा उद्योग – भाग 3

KPMG Report: कोरोनाचे संकट आणि बांधकाम उद्योग – भाग 4

KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने – भाग 5

Updated : 18 April 2020 9:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top