आमच्या गळ्यात पुन्हा मडकं आणि कमरेला झाडू बांधायचा का?
सामाजिक न्यायाची बांधिलकी सांगणारा राज्य सरकार सारथी आणि महाज्योती च्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसगट आधीछात्रवृत्ती देत असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन संशोधन करणाऱ्या 861 संशोधक विद्यार्थ्याना अधिछात्रवृत्ती वंचित ठेवण्यात आले आहे.
X
सामाजिक न्यायाची बांधिलकी सांगणारा राज्य सरकार सारथी आणि महाज्योती च्या संशोधक विद्यार्थ्यांना सरसगट आधीछात्रवृत्ती देत असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन संशोधन करणाऱ्या 861 संशोधक विद्यार्थ्याना अधिछात्रवृत्ती वंचित ठेवण्यात आले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशन सुरू असताना गेल्या 13 दिवसापासून उन्हातानात मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी चाकरी हॉटेलमध्ये वेठबिगारीची काम करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या वेदना सरकारला समजत नसेल तर पुन्हा एकदा आमच्या गळ्यात मडकी आणि कमरेला झाडू बांधायचा तर षडयंत्र मायबाप सरकार रचत नाही ना असा खडा सवाल या विद्यार्थ्यांनी मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केला? पहा आमचे प्रतिनिधी सागर गोडे यांनी थेट आझाद मैदानावरून या धगधगत्या प्रश्नाचा घेतलेला आढावा आणि ग्राउंड रिपोर्ट...