Home > मॅक्स रिपोर्ट > दिव्यांग शेतकऱ्याने द्राक्ष बाग तोडली, पण कशासाठी?

दिव्यांग शेतकऱ्याने द्राक्ष बाग तोडली, पण कशासाठी?

सांगली जिल्ह्यातील दिव्यांग शेतकऱ्याने द्राक्षांच्या झाडांवर कोयता चालवला आहे. पण नेमकं असं काय घडलं? ज्यामुळे हा शेतकरी द्राक्ष बाग तोडून टाकतोय? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांचा स्पेशल रिपोर्ट

दिव्यांग शेतकऱ्याने द्राक्ष बाग तोडली, पण कशासाठी?
X

कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच सांगली जिल्ह्यातील पेठ येथील शेतकरी विलास शेंडगे या शेतकरी दिव्यांग आहेत. मात्र त्यांनी द्राक्ष बाग जगवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यातच कोरोना लॉकडाऊनमुळे आलेल्या फळाला भाव मिळाला नाही. त्यामुळे सगळं हातचं गेलं. आता पुन्हा यंदा खतांसह चांगली मशागत केली. पण झालेल्या अतिवृष्टीमुळे विलास शेंडगे यांच्या द्राक्षबागेतील फळाची गळ झाली आणि हाती काहीच राहिलं नाही. त्यामुळे विलास शेंडगे हवालदिल झाले आहेत.

माझ्यावर बँक ऑफ इंडियाचं पाच तर खासगी बँकेचे 3 लाख रुपये कर्ज आहे. त्यामुळे आता या संकटात आम्ही जगावं तरी कसं? असा सवाल विलास शेंडगे यांनी व्यक्त केला आहे.

लहान लेकराप्रमाणे जपलेली बाग तोडताना प्रचंड वेदना होत आहेत. पण आमच्यासमोर काहीच पर्याय नसल्याचं सांगताना मनिषा शेंडगे यांचे डोळे पाणवले होते. त्यामुळे आम्हाला सरकारने मदत करावी, अशी मागणी या शेतकरी दांपत्याने केली आहे.

Updated : 10 Dec 2022 12:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top