Home > मॅक्स रिपोर्ट > जनतेचा जाहीरनामा : मालाडमध्ये सुरवंट किड्यांचा नागरिकांवर हल्ला, BMCचे दुर्लक्ष
जनतेचा जाहीरनामा : मालाडमध्ये सुरवंट किड्यांचा नागरिकांवर हल्ला, BMCचे दुर्लक्ष
प्रसन्नजीत जाधव | 13 Sept 2022 7:51 PM IST
X
X
मुंबईतील मालाड पूर्व विभागात इंदिरा कॉलनीत सुरवंट किड्यांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या भागात साधारणपणे 35000 हजार लोकांची लोकवस्ती आहे. या वस्तीत ज्या ठिकाणी नजर पडेल त्या ठिकाणी तुम्हाला सुरवंट किडे दिसतील. हा किडा चावला तर शरीराला खाज सुटते. एवढेच नाही तर डायबिटीस असलेल्या रुग्णांना जास्त त्रास होतो असा दावा स्थानिकांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरवंट किड्यांची संख्या वाढत असल्याने तेथील नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेला आपली समस्या कळवली आहे. पण तरीदेखील महानगरपालिकेने काहीच सहकार्य केले नाही असे तेथील स्थानिक सांगतात. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी...
Updated : 13 Sept 2022 7:53 PM IST
Tags: mumbai
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire