Pen | पेण : सर्प दंश झालेल्या मुलीचा उपचारा अभावी मृत्यू
X
सर्प दंश झाल्याने सारा ठाकूर या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना पेण तालुक्यातील जिते गावात घडली आहे. उपचारा अभावी साराचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
सारा हिला मन्यार जातीचा विषारी सर्पाने दंश केला. तिला उपचारासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे उपचार न झाल्याने पेण येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे देखील उपचार करण्यात आले नाहीत. त्या नंतर तिला अलिबाग जिल्हा रुग्णालयात व त्यानंतर कळंबोली येथील रुग्णालयात नेले मात्र योग्यवेळी उपचार न मिळाल्याने सारा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.सारा हिच्या मृत्येने जिते गावावर शोककळा पसरली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार का होऊ शकले नाहीत? तिला कळंबोली पर्यंत पोहचवेपर्यंत उशीर झाला होता.
उपचारा अभावी साराचा मृत्यू झाल्याने जिल्हयातील आरोग्य यंत्रणेचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.