'त्या' आरोपावर पंकजा मुंडे अजुनही गप्प
X
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्युनंतरही त्यांच्या निधनाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यात आणखी एक भर पडलीय. ती म्हणजे लंडनस्थित शुजा सय्यद या सायबर एक्सपर्ट ने मुंडेंचा अपघातात मृत्यू झाला नसून त्यांचा खुन झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. भारतात २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये हॅकिंग झाल्याचे पुरावेच आपल्याकडे असून ते प्रसंगी सादरही करू शकतो, असा दावा सय्यद याने केल्यामुळे देशातील राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
दरम्यान या संदर्भात विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन या संपुर्ण प्रकरणाची राॅ कडून तपासणी करण्याची मागणी केली आहे.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1087383270109659136
या सोबतच इतर पक्षांनी सुध्दा या प्राकरणाची सखोल चौकशाी व्हावी अशी मागणी केली आहे.
मात्र यासंदर्भात मुंडे यांची कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डाँ. प्रीतम मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला कुठलाही प्रतिसाद दिला नाही किंवा कोणत्याही वृत्तवाहिनीला अथवा एजन्सीला या प्रकरणा बाबत कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.