Home > मॅक्स रिपोर्ट > लोकगायिका तीजन बाई यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

लोकगायिका तीजन बाई यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

लोकगायिका तीजन बाई यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर
X

लोकगायिका तीजनबाई यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोण आहेत तीजनबाई जाणून घेऊयात त्यांच्या कारकीर्दीबद्दल...

कोण आहे तीजनबाई

मूळच्या छत्तीसगढच्या असलेल्या तीजनबाई या पंडवानी लोक गीत आणि नाटकाची पहली महिला कलाकार आहे. आपल्या लोककलेचा आणि लोकगीताचे सादरीकरण देश-विदेशात तीजनबाई करत असतात.

भिलाईतल्या गनियारी या गावात तीनजनबाईचा जन्म झाला असून वडिल हुनुकलाल परधा आणि आई सुखवती असून तीजनबाई यांनी आजोबा ब्रजलाल यांच्या कडून महाभारताच्या गोष्टी ऐकत ऐकत त्यांनी लोककला आणि गीत अवगत केलं. 13 वर्षांची असताना त्यांनी पहिल्यांदा मंचावर लोकगीताचे सादरीकरण केले.

पंडवानी लोककला आणि गीत सादर करताना दोन विशिष्ट पद्धतीचा वापर केला जात असे. यात महिला फक्त बसून गायन करु शकतात याला वेदमती शैली म्हटलं जात असे. तर पुरुषमंडळींना उभं राहुन गायन करावं लागतं असे त्याला कापालिक शैली म्हटलं जात असत. मात्र या दोन्ही पद्धतीला न जुमानता तीजनबाई या महिला असून उभ्या राहून लोकगीत सादर करत असतात. या लोकगायिका तीजनबाई यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Updated : 26 Jan 2019 4:34 PM IST
Next Story
Share it
Top