Home > News Update > Covid 19: राज्यात एका दिवसात 440 रुग्णांची नोंद, रुग्णांची संख्या 8068 वर

Covid 19: राज्यात एका दिवसात 440 रुग्णांची नोंद, रुग्णांची संख्या 8068 वर

Covid 19: राज्यात एका दिवसात 440 रुग्णांची नोंद, रुग्णांची संख्या 8068 वर
X

आज राज्यात कोरानाचे ११२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ११८८ करोना बाधीत रुग्णांवर यशस्वी इलाज झाला आहे. आज दिवसभरात घेण्यात आलेल्या टेस्ट मध्ये ४४० नवीन रुग्णाच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या..

मृत्यू:

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या...

आज राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८०६८ वर पोहोचली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८०६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९१६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुणे महानगरपालिका येथे ३, जळगाव येथे २, सोलापूर शहरात १, तर लातूर येथे १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७ रुग्ण आहेत तर १० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर २ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी ४ रुग्णांच्या इतर आजारांबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित १५ रुग्णांपैकी ११ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे

अ.नं.जिल्हा / महानगरपालिकाबाधित रुग्णणमृत्यू
मुंबई महानगरपालिका५४०७२०४
ठाणे७३८१४
पालघर१४१
रायगड५७
मुंबई मंडळ एकू ण६३४३२२३
नाशिक१३११२
अहमदनगर३६
धुळे२५
जळगाव१९
नंदुरूबार११

नाशिक मंडळ एकूण२२२२२
१०पुणे१०५२७६
११सोलापूर४७
१२सातारा२९
पुणे मंडळ एकूण११२८८३
१३कोल्हापूर१०
१४सांगली२७
१५सिंधुदूर्ग
१६रत्नागिरी
कोल्हापूर मंडळ एकूण४६
१७औरंगाबाद५०
१८जालना
१९हिंगोली
२०परभणी
औरंगाबाद मंडळ एकूण६१
२१लातूर
२२उस्मानाबाद
२३बीड
२४नांदेंड
लातूर मंडळ एकूण१४
२५अकोला२९
२६अमरावती२०
२७यवतमाळ४८
२८बलु ढाणा२१
२९वाशिम
अकोला मंडळ एकूण११९
३०नागपूर१०७
३१वर्धा
३२भंडारा
३३गोंदिया
३४चंद्रपूर
३५गडिचिरोली
नागपूर एकूण११०
इतर राज्ये२५
एकूण ८०६८ ३४२

( टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ६०४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८६०३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३३.७२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Updated : 26 April 2020 8:21 PM IST
Next Story
Share it
Top