एकीकडे मोदी सरकारचा शपथविधी सोहळा तर दुसरीकडे विरोधक पुन्हा ट्रोल
Max Maharashtra | 30 May 2019 6:06 PM IST
X
X
नरेंद्र मोदी हे काही वेळातच पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळं आज सकाळपासूनच नेटिझन्सनी काँग्रेससह प्रमुख विरोधकांना ट्रोल करायला सुरूवात केलीय. अपेक्षेप्रमाणे यावेळी नेटिझन्सच्या ट्रार्गेटवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच आहेत. ट्विटरवर #ModiSarkar2 हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. या हॅशटॅगचा वापर करून वेगवेगळे मिम अपलोड कऱण्यात आले आहेत.
या मिम्समध्ये राहुल गांधी यांना सिक्युरिटी गार्ड म्हणून दाखवण्यात आलं असून त्यांच्या छातीवर BJP चा बॅच दाखवण्यात आलाय. तर बसपा नेत्या मायावती यांच्या मांडीवर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे लहान मुलासारखे दाखवण्यात आले आहेत. तर एका मिममध्ये राहुल गांधी आणि तृणमुलच्या नेत्या ममता बॅनर्जी दाखवण्यात आल्या आहेत, त्यात थ्री इडियट चित्रपटाची थीम घेऊन खाली पत्रकार रवीशकुमार यांच्यावरही टीका करणारं मिम बनवण्यात आलंय. तर एका मिममध्ये बोलेरो गाडी दाखवून त्याखाली समाजवादी पार्टी से भी ज्यादा सीटे, असं उपसाहात्मक वाक्य लिहिलेलं आहे.
पाहा हे काही ट्वीट…
Updated : 30 May 2019 6:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire