Home > Election 2020 > भाजपमधून एकही मुस्लिम खासदार निवडून आला नाही

भाजपमधून एकही मुस्लिम खासदार निवडून आला नाही

भाजपमधून एकही मुस्लिम खासदार निवडून आला नाही
X

संसदेत मुस्लिम मतदारांच्या तुलनेत खासदार निवडून जात नसल्याची ओरड व्हायची. मात्र, 17 व्या लोकसभा निवडणूकीत 27 मुस्लिम खासदार निवडून आले आहेत. या 27 पैकी डझनभर खासदार हे एकट्या उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमधून निवडून आले आहेत. देशभरात स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपनंही मुस्लिम समाजातील सहा उमेदवारांना तिकिटं दिली होती. मात्र, त्यापैकी एकही उमेदवार निवडून आला नाही.

भक्कम बहुमत मिळवलेल्या भाजपनं जम्मू-काश्मीरमधून तीन, पश्चिम बंगालमधून दोन आणि लक्षद्वीपमधून एक अशा एकूण सहा मुस्लिम उमेदवारांना तिकिटं दिली होती. मात्र, त्यापैकी एकही जागा निवडून येऊ शकली नाही.

जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे मोठे नेते फारूक अब्दुल्ला, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान हे देशपातळीवरील मुस्लिम नेत्यांपैकी मोठे चेहरेही लोकसभेवर निवडून आले आहेत.

उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांचा मोठा प्रभाव आहे. या दोन्ही राज्यातून प्रत्येकी सहा खासदार मुस्लिम समाजाचे निवडून आले आहेत. केरळ, जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यातून प्रत्येकी तीन तर आसाम आणि बिहारमधून मुस्लिम समाजाचे प्रत्येकी दोन खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत.

महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि तेलंगण या राज्यातून प्रत्येकी एक मुस्लिम खासदार निवडून आले आहेत.

कोणत्या पक्षात किती मुस्लिम खासदार

तृणमुल काँग्रेस – 5

काँग्रेस – 4

समाजवादी पार्टी – 3

बहुजन समाज पार्टी – 3

नॅशनल कॉन्फरन्स – 3

इंडियन युनियन मुस्लिम लीग – 3

एमआयएम – 2

लोकजनशक्ती पार्टी – 1

राष्ट्रवादी काँग्रेस – 1

सीपीआय (एम) – 1

एआययूडीएफ – 1

सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या 20 टक्के मुस्लिमांची लोकसंख्या आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणूकीत 23 मुस्लिम खासदार निवडून आले होते. त्यात काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसमधील खासदार सर्वाधिक होते. त्याआधी 2009 च्या लोकसभा निवडणूकीत 34 मुस्लिम खासदार तर 2004 च्या लोकसभा निवडणूकीत 30 मुस्लिम खासदार निवडून आले होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसप्रणित युपीए केंद्रात सत्तेवर होती.

1980 मध्ये आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे 49 मुस्लिम खासदार संसदेत होते. त्यानंतर इंदिरा गांधींचं निधन झालं आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि मुस्लिम खासदारांची संख्या 42 झाली. 1952 मध्ये सर्वात कमी म्हणजे 11 खासदार हे लोकसभेवर निवडून आले होते.

निवडून आलेले मुस्लिम खासदार

असदुद्दीन ओवैसी – एमआयएम – मतदारसंघ - हैदराबाद

इम्तियाज जलील – एमआय़एम – मतदारसंघ - औरंगाबाद

चौधरी महेबुब अली कैसर – लोकजनशक्ती पार्टी – मतदारसंघ – खागारिया

बद्रुद्दीन चौधरी – एआययुडीएफ – मतदारसंघ – धुबरी (आसाम)

महमद फजल – राष्ट्रवादी काँग्रेस – मतदारसंघ – लक्षद्वीप

महमद जावेद – काँग्रेस – मतदारसंघ – किशनगंज (बिहार)

महमद सादिक – काँग्रेस – मतदारसंघ – फरीदकोट (पंजाब)

अबु हासिम खान चौधरी – काँग्रेस – मतदारसंघ – मालदा दक्षिण (प.बंगाल)

अब्दुल खालिक – काँग्रेस – मतदारसंघ – बारपेट (आसाम)

नुसरत जहाँ रूही – तृणमुल काँग्रेस – मतदारसंघ – बसिरहत (प.बंगाल)

आफरीन अली – तृणमुल काँग्रेस – मतदारसंघ आरमबाग (प.बंगाल)

खलील उर रहमान – तृणमुल काँग्रेस – मतदारसंघ – जांगीपूर (प.बंगाल)

अबु ताहर खान – तृणमुल काँग्रेस – मतदारसंघ – मुरसीबाद (प.बंगाल)

सजदा अहमद – तृणमुल काँग्रेस – मतदारसंघ – उलूबेरिया (प.बंगाल)

आझम खान – समाजवादी पार्टी – मतदारसंघ – रामपूर (उ.प्रदेश)

एसटी हसन – समाजवादी पार्टी – मतदारसंघ – मोरादाबाद (उ.प्रदेश)

शफीउर रेहमान – समाजवादी पार्टी – मतदारसंघ – संभल (उ.प्रदेश)

अफझल अन्सारी – बहुजन समाज पार्टी – मतदारसंघ – गाझीपूर (उ.प्रदेश)

दानिश अली – बहुजन समाज पार्टी – मतदारसंघ – अमरोहा (उ.प्रदेश)

हाजी फजलूर रेहमान – बहुजन समाज पार्टी – मतदारसंघ – सहारनपूर (उ.प्रदेश)

पीके कुन्हालीकुट्टी – आयुएमएल – मतदारसंघ – मलप्पुरम (केरळ)

इ.टी. महमद बशीर – आयुएमएल – मतदारसंघ – पोन्नानी (केरळ)

के नवास कानी – आयुएमएल – मतदारसंघ – रामनाथपूरम (तामिळनाडू)

ए एम आरिफ – सीपीआय (एम) – मतदारसंघ – अलाप्पूझा (केरळ)

फारूख अब्दुल्ला – नॅशनल कॉन्फरन्स – मतदारसंघ – श्रीनगर (जम्मू-काश्मीर)

हसनैन मसुदी – नॅशनल कॉन्फरन्स – मतदारसंघ - अनंतनाग - (जम्मू-काश्मीर)

महमद अकबर लोन – नॅशनल कॉन्फरन्स – मतदारसंघ – बारामुल्ला (जम्मू-काश्मीर)

Updated : 24 May 2019 9:15 PM IST
Next Story
Share it
Top