चक्क धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरुन जावयाची काढली वरात
X
लग्नात घोड्यावरून वरात काढणाऱ्या प्रथा आजपर्यंत पाहीली असाल परंतू बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. जावयाला गाढवावर बसवून संपूर्ण गावात जल्लोषात धुलिवंदन साजरी केलं जातं. डोल, ताशा, बँन्जो, डीजे वाजवत या जावयाची वरात काढली जाते. ही परंपरा 10 दशकाची असल्याचं येथील नागरिकांनी सांगितली आहे.
होळी, धुलिवंदन साजरी करण्याची प्रथा, परंपरा हि प्रत्येक गावात वेगवेळी आहे. त्याच प्रमाणे विडा गावात ही परंपरा १० दशकांपासून सुरू आहे. त्या संदभातील तेथील ग्रामस्थांनी या प्रथेमागचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले आहेत की " ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी आम्हाला जावई शोधायला अनेक अडचणी येतात. अनेकदा अपशब्दही वापरले जातात. ही परंपरा आम्हाला चालू ठेवायची आहे. अनेक जावई सागंता पण या प्रथेतून पळ काढतात. आम्ही गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढतो. त्यानंतर त्यांना मान पान, सन्मान दिला जातो, सोन्याची आंगठी दिली जाते त्यांचा सत्कार करु पाठवलं जात असल्याचं येथिल ग्रामस्थानी सांगितले.
या गावात लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवताना अख्ख गाव डीजेच्या तालावर नाचतात या मध्ये महिलाही मागे राहतं नाहीत. यासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधला असता त्यातील एकाने सांगितलं की हा पूर्वीपासून आमच्याकडे सुरु आहे. थट्टा मस्करी पासून सुरू झालेली हि प्रथा आहे आनंदराव देशमुख यांचे जावई याठिकाणी आले असता थट्टा मस्करी त्यांची गावातील हमरस्त्यावरून धिंड काढली होती. तेव्हापासून गावात हि प्रथा चालू झाल्याचं सांगितलं आहे
यावर्षीचे मानकरी जावई केस तालुक्यातीलच असलेल्या सिंधी या गावातील संतोष जाधव हे आहेत तर विडा या गावातील एकनाथ पवार यांचे ते जावई आहेत. या धुलिंवदना निमित्त मानपान आंगठी देत सन्मान केला आहे.