Home > मॅक्स रिपोर्ट > नेटवरील भक्त 'प्रियंकास्रा'ने बिथरले

नेटवरील भक्त 'प्रियंकास्रा'ने बिथरले

नेटवरील भक्त प्रियंकास्राने बिथरले
X

2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाने एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या महासचिवपदी प्रियंका गांधी याची निवड करण्यात आली आहे. प्रियंकाने राजकारणात यावे अशी मागणी नेहमीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने येत्या निवडणुकांसाठी प्रियंकास्त्र हाती घेतलं आहे. मात्र प्रियंकाचे राजकारणात येणे हे काही सोशल मीडियावरील नेटीझन्सच्या पचनी पडले नाही. म्हणूनचं प्रियंका गांधीवर गलिच्छ शब्दांत टीका करण्यात आली आहे.

नेटिझन्सची सोशल मीडियावरुन प्रियंका गांधीवर टीका

सौ. सोशल मीडिया

सौ. सोशल मीडिया

सौ. सोशल मीडिया

दरम्यान, असे गलिच्छ कमेंट्स पाहता काही नेटकऱ्यांनी अशाही पोस्ट केल्या आहेत.

सौ. सोशल मीडिया

वरील सर्व पोस्ट वाचले असता तुमच्या लक्षात आलं असेल की, एखादी महिला जेव्हा राजकारणात येते तेव्हा तिला कमीपणा देण्यासाठी किंवा ती या पदाची दावेदार नाही, तिला काही येत नाही अशा एक ना अनेक बाबींनी तिला हीनपणा देत टीका केली जाते...

राजकारण म्हटलं की पुरुषांची मक्तेदारी आणि त्यांचीच गर्दी... निर्णय घेणे, घोषणा देणे इ. सगळ्यात त्यांचीच बाजी असते. मात्र ज्यावेळेला एका पक्षाच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी महिलेच्या हातात येते त्यावेळी जनतेच्या अपेक्षा अधिका-अधिक वाढत जातात. राजकारणात आज महिलांचे प्रतिनिधित्व फार कमी पाहायला मिळतेय. आणि जे करतायत त्यांच्यावर गलिच्छ भाषेचा वापर ह्या समाजातील काही घटक करित आहे.

महिला राजकारणात आल्यास किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तिने भाष्य केल्यास सर्वात प्रथम शाब्दिक हल्ला होतो तो तिच्या चारित्र्यावर... मग ती राजकारणी असो किंवा प्रसारमाध्यामातील महिला पत्रकार. महिलांना दुय्यमत्व देत हा समाज पुढे जाण्याचा विचार करत आहे. मात्र महिलांशिवाय हा समाज घडू शकत नाही याची प्रचिती नेहमीच तुमच्या आमच्या समोर येत असते.

Updated : 24 Jan 2019 1:19 PM IST
Next Story
Share it
Top