Home > News Update > धक्कादायक ! शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

धक्कादायक ! शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

धक्कादायक ! शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक
X

नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB) च्या आलेल्या अहवालानुसार 2018 मध्ये शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी (Unemployment) आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2018 मध्ये 12,936 बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचं अहवालातील आकडेवारी सांगते. 2018 मध्ये 10,349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये ५७६३ शेतकऱ्यांनी आणि ४५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केली आहे. ५४५७ पुरुष शेतकरी आणि ३०६ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता.

शेतमजुरांमध्ये ४०७१ पुरुष आणि ५१५ महिलांचा समावेश होता.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये देशात आत्महत्या करणाऱ्या लोकांचं प्रमाण 3.6 % वाढलं आहे.

NCR च्या आकडेवारी नुसार 2018 मध्ये आत्महत्या केलेल्या लोकांची संख्या 1 लाख 34 हजार 516 इतकी आहे.

हे ही वाचा

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अखेर मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुलीच्या छेडछाडीचा आरोप असलेले DIG मोरे निलंबित…

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांची नवीन योजना

2017 मध्ये 1 लाख 29 हजार 887 लोकांनी आत्महत्या केली आहे. आपण जर 2017 च्या आकडेवारी वर नजर टाकली तर बेरोजगारी ला कंटाळून 12 हजार 241 लोकांनी आत्महत्या केल्याचं दिसून येत. त्याचवेळेला 2017 शेतकरी आत्महत्यांचा विचार केला तर 10, 655 शेतकऱ्य़ांनी आत्महत्या केल्याचं दिसून येतं. 2016 च्या तुलनेत 2017 मध्य़े शेतकरी आत्महत्याचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारी वरुन दिसून येते. 2016 मध्ये 11 हजार 379 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं होतं. या दोनही वर्षांमध्ये 724 शेतकरी आत्महत्यांचा फरक आहे.

केरळ मध्ये सर्वांधिक बेरोजगारांच्या आत्महत्या

NCRB च्या अहवालानुसार पुरुष बेरोजगारांनी महिलांच्या तुलनेत जास्त आत्महत्या केल्याचं दिसून येतं. महिलांच्या तुलनेत 82 टक्के पुरुषांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. बेरोजगारी मुळे आत्महत्या केलेल्या बेरोजगारांच्या संख्या केरळ मध्ये अधिक आहे.

केरळ 1585

तमिलनाडू 1579

महाराष्ट्र 1260,

कर्नाटक 1094

आणि उत्तर प्रदेश 902

वरील आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्र सारख्या औद्योगिक राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आत्महत्या मोठी चिंतेची बाब आहे. या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.

2018 मध्य़े 1,34,516 लोकांनी संपवलं जीवन

अहवालाचा विचार केला तर 2018 मध्ये एकूण 1,34,516 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2017 मध्ये 1,29,887 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या वर्षाच्या तुलनेत या आकडेवारीत 3.6 टक्के इतकी वाढ झाली आहे.

जर सर्व प्रकारच्या आत्महत्यांचा विचार केला तर महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 17,972 लोकांनी आपलं जीवन संपवलं. तर दूसऱ्या, तीसऱ्या, चौथ्या आणि पांचव्या स्थानावर क्रमश: तमिलनाडू (13,896), पश्चिम बंगाल (13,255), मध्य प्रदेश (11,775) आणि कर्नाटक (11,561) ही राज्य आहेत. या पांच राज्यात 50.9 टक्के इतक्या लोकांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे.

Updated : 10 Jan 2020 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top