Home > मॅक्स रिपोर्ट > मराठी साहित्य संमेलनातून नयनतारा सहगल यांचं नाव का झालं रद्द?

मराठी साहित्य संमेलनातून नयनतारा सहगल यांचं नाव का झालं रद्द?

मराठी साहित्य संमेलनातून नयनतारा सहगल यांचं नाव का झालं रद्द?
X

ज्येष्ठ साहित्यिक, लेखिका नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धाटनाला येऊ नका असं साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी पत्र लिहून सांगितले आहे. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून नयतारा यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या नावाला विरोध होत असल्यामुळे साहित्य संमेलन आयोजकांनी ही भूमिका घेतली आहे.

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र लिहून आपली असमर्थता दर्शवली आहे. दरम्यान नयनतारा सहगल या संमेलनाचे उद्धाटक म्हणून येणार होत्या मात्र त्यांच्या नावाला शेतकरी न्याय हक्क समितीने आणि मनसेने विरोध दर्शविला होता. यामुळे संमेलनाच्या आयोजनकांकडून सहगल यांना उद्धाटनाला येऊ नका असं सांगितल्यामुळे साहित्यसृष्टीत विचारवंतमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

नयनतारा यांचे नाव रद्द करण्यामागील कारणं...

दरम्यान नयनतारा यांनी यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, मी या संमेलनाला यावं हा आयोजकांचा आग्रह होता मात्र आता असं पत्र देऊन येऊ नका सांगितल्यानंतर मलाच आश्चर्य वाटू लागले आहे. मी आधीच माझ्या भाषणाची कॉपी आयोजकांना पाठवली होती. भाजपशासित राज्य असल्यामुळे कदाचित माझं भाषण मुख्यमंत्र्यांना आवडलं नसावं. माझ्या शब्दांमध्ये काही त्यांना घाबरवणारं असावं, असा अंदाज सहगल यांनी व्यक्त केला.

नयनतारा यांच्या भाषणात काय होते?

मी साहित्यितांना आता देशात काय चाललंय, स्थिती का बिघडत चालली आहे. द्वेषाचं वातावरण का पसरवलं जातं आहे हे हिंदू राष्ट्र आहे असं का सांगितलं जात आहे याबद्दल मी सांगणार होते, असं सहगल यांनी सांगितल. कदाचित हे सगळं बोलणं आपल्या व्यासपीठावरुन ऐकणं मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सहन झालं नसतं, असंही सहगल म्हणाल्या. म्हणून माझं नाव रद्द करण्यात आलं असावं.

कोण आहेत नयनतारा सहगल?

लेखिका नयनतारा सहगल या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत. तसेच या देशात पुरस्कार वापसीची सुरुवात करणाऱ्या लेखिका आहेत. सहगल यांना 'रिच लाईक अस' या पुस्तकासाठी राजीव गांधीच्या कार्यकाळात म्हणजे १९८६ साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता.

Updated : 6 Jan 2019 6:22 PM IST
Next Story
Share it
Top