Home > मॅक्स रिपोर्ट > मीटूचा परिणाम, 'नारी शक्ती' शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत

मीटूचा परिणाम, 'नारी शक्ती' शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत

मीटूचा परिणाम, नारी शक्ती शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत
X

नारी शक्ती या शब्दातचं महिलांचे अधिकार त्यांचे सक्षमीकरण हे सर्व काही आलं. या एका शब्दांवर अनेक छोट्या-मोठ्या चळवळी, लढे उभारले गेले. आता या शब्दाला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे.

ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018 मधील 'वर्ड ऑफ द ईयर' म्हणून 'नारी शक्ती' या शब्दाची घोषणा केली आहे. जयपूर येथे आयोजित साहित्य महोत्सवात ही घोषणा करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते ‘नारी शक्ती’ हा शब्द संस्कृतमधून घेण्यात आला आहे. महिलांचे अधिकार आणि प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या प्रतिनिधीत्वासंदर्भात 'नारी शक्ती' या हिंदी शब्दाचा उपयोग केला जातो. त्यामुळे बऱ्याच मंथनानंतर ‘नारी शक्ती’ या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. महिला सशक्तीकरणासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि मीटू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या शब्दाचा डिक्शनरीत समावेश करण्यात आल्याची माहिती ऑक्सफर्डकडून देण्यात आली आहे. याआधी ऑक्सफर्डने 2017 मध्ये ‘आधार’ या शब्दाचा डिक्शनरीत समावेश केला होता.

Updated : 27 Jan 2019 5:14 PM IST
Next Story
Share it
Top