Home > मॅक्स रिपोर्ट > नादिया मुराड व डेनिस मुकवेगेंना नोबेल पुरस्कार जाहीर

नादिया मुराड व डेनिस मुकवेगेंना नोबेल पुरस्कार जाहीर

नादिया मुराड व डेनिस मुकवेगेंना नोबेल पुरस्कार जाहीर
X

सिरीयात जन्माला आलेली नादिया मुराड हि तब्बल ९० दिवस आयएसआयएसआय या संघटनेच्या ताब्यात होती. अपहरण, बलात्कार यासर्व अत्याचारांतून मार्ग काढत नादियाने आपली सुटका केली. व जर्मनीचा आसरा घेतला. नादियाने युनेसमोर आपल्या सोबत घडलेल्या दुष्टकृत्यांचा पाढा वाचला तेव्हा सर्व युएन सभागृहात अश्रुच्या धारा वाहत होत्या. तिने सांगितल्याने सिरीयात महिला व मुलांवर कसे अत्याचार होतात हे जगा समोर आले. नादिया मुराड हिला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तिच्यासोबत डॅाक्टर डेनिस मुकवेगे यांना देखील शांततेचा नोबेल पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. एक बलात्कारातून गरोदर असलेली महिला त्यांच्याकडे उपचारासाठी आली होती. महिलांवर होणारे अत्याचार यासाठी वैद्यकीय उपचारापेक्षा बोलणे महत्त्वाचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. आणि महिलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून ते बोलू लागले. यातून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील झाला. हिंसेला प्रेमाचाच पर्याय आहे अशी त्यांची श्रद्धा आहे.

Updated : 6 Oct 2018 1:31 PM IST
Next Story
Share it
Top