रोज 600 एसटी गाड्यांची वाहतूक होणारे एसटी स्थानक रात्री असते बंद,प्रवाशांची सुरक्षा धोक्यात
तीन राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी 40 हजाराहुन अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ शहरात एसटी स्थानक असून या एसटी स्थानकातून 24 तासात सुमारे 600 गाडया ये - जा करतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी असनारे एसटी स्थानक मात्र कट्रोलंर विना रात्री 10 ते सकाळी 6 वाजे पर्यंत बंद असते. या रात्रीच्या कालावधीत अनेक प्रवाशाना होणारा त्रास लक्षात घेता रात्रीच्या काळात मोहोळ एसटी स्थानकात वाहतूक नियंत्रक देण्यात यावी अशी मागणी आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राउंड रिपोर्ट..
X
सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या मोहोळ एसटी स्थानकातून पुणे,नाशिक,अहमदनगर,सातारा,सांगली,कोल्हापूर,सिंधुदुर्ग,चिपळूण,लातूर,उस्मानाबाद,तुळजापू,नांदेड,हिंगोली,परभणी,जालना जवळपास महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात या एसटी स्थानकातून एसटी वाहतूक होते. तसेच आंतरराज्य वाहतूकही येथून होते. येथून कर्नाटक, आंध्र प्रदेश,गोवा या राज्यात सुद्धा या एसटी स्थानकातून एसटी गाड्या जातात. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट,पंढरपूर,कुर्डुवाडी,सांगली,अकलूज,बार्शी,माळशिरस,मंगळवेढा,वैराग,उत्तर सोलापूर,दक्षिण सोलापूर,सोलापूर शहर,या ठिकाणी जाण्यासाठी या एसटी स्थानकातूनच एसटी गाड्या जातात. मोहोळ एसटी स्थानकातून दररोज सुमारे 600 एसटी गाड्यांची वाहतूक असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाही रात्रीच्या वेळी एसटी स्थानक बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय होवू लागली आहे. रात्रीच्या वेळी जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी गाड्या थेट सोलापूर - पुणे,मोहोळ - पंढरपूर रस्त्यावर प्रवाशांना सोडून निघून जात आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरलेले प्रसाशी एसटी स्थानकात थांबत असून यामध्ये प्रवाशी महिलांचाही समावेश असतो. एसटी गाड्या मोहोळ एसटी स्थानकातून जाव्यात,यासाठी रात्रीच्या वेळी या स्थानकात एसटी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी. अशी मागणी करून व्यापारी संघटना,सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले असून व्यापारी संघटनेच्या वतीने एसटी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोहोळ एसटी स्थानकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तीन राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी 40 हजाराहुन अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ शहरात एसटी स्थानक असून या एसटी स्थानकातून 24 तासात सुमारे 600 गाडया ये - जा करतात. अशा वर्दळीच्या ठिकाणी असनारे एसटी स्थानक मात्र कट्रोलंर विना रात्री 10 ते सकाळी 6 वाजे पर्यंत बंद असते. या रात्रीच्या कालावधीत अनेक प्रवाशाना होणारा त्रास लक्षात घेता रात्रीच्या काळात मोहोळ एसटी स्थानकात वाहतूक नियंत्रक देण्यात यावा,अशी मागणी शहर वाशीयांच्या वतीने चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण डोके यांनी केली आहे. 104 गावासह सुमारे साडेतीन लाख लोकसंख्या असणारा मोहोळ तालुका हा मुंबई - हैदाबाद, मुंबई - विजापुर , मोहोळ - आंळदी , या तिन राष्ट्रीय महामार्गासह , पंढरपूरचा विठोबा , तुळजापुरची अंबाबाई , अक्कलकोटचे स्वामी समर्थ , कोल्हापुरची कुलस्वामीनी सह अनेक तिर्थक्षेत्राला जोडणारे एसटी स्थानक आहे. परंतु तालुक्याचे ठिकाण असून रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महामंडळाचे ऑफिस बंद असते. रात्रीतून वेळीही एसटी वाहतूक होते,परंतु त्या एसटी स्थानकात येत नाहीत. एसटी वाहतूक नियंत्रक ऑफिस बंद असल्या कारणाने त्यांची नोंद होत नाही . अनेक बस बाहेरून जातात, त्यामुळे महिला व लहान मुले तसेच अनेक प्रवाशी मध्य रात्री पासून एसटी स्थानकात गाडीची वाट पहात बसतात. परंतु ऑफीस बंद असल्याने गाड्या बाहेरुनच निघुन जातात. बसस्थानकात सुरक्षितता व सर्व उतरणाऱ्या प्रवाशाच्या सोयी साठी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ऑफिस उघडे असणे गरजेचे असल्याने रात्रीच्या काळात ऑफीत सुरु ठेवण्याची मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे.
जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या एसटी स्थानकाची जागेअभावी कोंडी
सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या मोहोळ शहरातील एसटी स्थानकाचा प्रश्न ऐरणीवर आला असून एसटी स्थानकाच्या दोन्ही बाजूनी हायवे रोड गेल्याने एसटी स्थानकाची जागेअभावी कोंडी झाली आहे. काही वर्षांपूर्वी पुणे-सोलापूर हायवेच्या चौपदरीकरणावेळी मोहोळ एसटी स्थानकाची जागा भूसंपादीत करण्यात आली होती. राहिलेल्या अपुऱ्या जागेत एसटी स्थानकाचे कामकाज कसेबसे सुरू होते,पण मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गासाठी पुन्हा मोहोळ एसटी स्थानकाची जागा संपादित करण्यात आल्याने मोहोळ एसटी स्थानक अपुऱ्या जागेच्या कचाट्यात सापडले आहे. या एसटी स्थानकातून दिवसभरात 600 एसटी गाड्याची ये-जा असते. अपुऱ्या जागेमुळे एसटी गाड्या मोहोळ स्थानकात थांबण्यास व वळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांना ही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय अनास्थेमुळे गेल्या अनेक दिवसापासून मोहोळ एसटी स्थानकाचा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचा आरोप प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे. अपुऱ्या जागेअभावी एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जागेचा प्रश्न लवकर नाही सुटल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रवाशी वर्गातून देण्यात येऊ लागला आहे. या एसटी स्थानकात एसटी गाडी घेऊन येत असताना किंवा जाताना एसटी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एसटी स्थानकासाठी पर्यायी जागा लवकर उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी जनतेत जोर धरू लागली आहे.
मोहोळ- आळंदी पालखी मार्गाच्या चौपदीकरणामुळे मोहोळ बसस्थानक बनले बस स्टॉप
या एसटी स्थानकाच्या समोरून सोलापूर-पुणे व बाजूने गेलेल्या मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गासाठी मोहोळ एसटी स्थानकाची जागा करण्यासाठी हे करण्यात आली आहे. जागेची कोंडी झाल्याने एसटी चालक व प्रवाशांना अडचणीतून मार्ग काढत एसटी स्थानकात यावे लागते. मोहोळ एसटी स्थानकाच्या समोर सोलापूर-पुणे हायवेवर उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. याच उड्डाण पुलाखालून कर्नाटकातील विजापूर येथे जाण्या-येण्यासाठी महामार्ग आहे. या मार्गावरून सतत अवजड वाहनांची रेलचेल असते. उड्डाण पूल बनवला असल्याने पुण्यावरून येणाऱ्या एसटी गाड्या वळसा घालून एसटी स्थानकात येतात. तर विजापूर रस्त्यावरून येणारी वाहने ब्रिजच्या बाजूने बनवलेल्या रस्त्याने एसटी स्थानकाच्या सर्व्हिस रस्त्याने जातात. याच ब्रिजच्या खालून पंढरपूर-आळंदीला जाण्यासाठी पालखी महामार्ग बनवला जात आहे. या रस्त्याचे काम सध्या प्रगीपथावर आहे. हा रस्ता एसटी स्थानकाच्या अगदी चिटकून गेला आहे. त्यामुळे एसटी गाड्या वळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. एसटी स्थानकाच्या परिसरात खाण्या-पिण्याचे स्टॉल आहेत. या स्टॉल धारकानी ही एसटी स्थानकाची जागा व्यापली आहे.
आंध्र प्रदेश,गोवा,कर्नाटक,सोलापूर पुणे,मुंबई,सातारा,सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी,उस्मानाबाद,तुळजापूर,लातूर,परभणीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी गाड्या याच स्थानकातून जातात
मोहोळ एसटी स्थानक एसटी गाड्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. येथूनच गोवा,कर्नाटक, आंध्र प्रदेश, या राज्यातील एसटी बसेसची ये-जा असते. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा,सांगली,पुणे या जिल्ह्यात याच एसटी स्थानकातून गाड्या जातात. कोकणातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग, मालवण,रायगड याठिकाणी येथूनच एसटी गाड्या जातात. नाशिक,अहमदनगर,शिर्डी येथे जाणाऱ्या गाड्यासाठी मोहोळ एसटी स्थानक महत्वाचे आहे. याच स्थानकातून मराठवाड्यातील उस्मानाबाद,तुळजापूर, लातूर,बीड,परभणी,नांदेड, येथे एसटी जातात. मोहोळ एसटी स्थानक जिल्ह्याच्या मध्यवर्ती असल्याने याठिकाणावरून सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात वाहतूक होते. येथूनच जिल्ह्यातील अकलूज,माळशिरस,बार्शी,वैराग,अक्कलकोट, पंढरपूर, कुर्डुवाडी,करमाळा याठिकाणी एसटी वाहतूक होते. तसेच मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडेगावातील एसटी वातुकीसाठीचा भार ही याच एसटी स्थानकावर आहे. दिवसभरात मोहोळ एसटी स्थानकातून शेकडो गाड्यांची ये-जा सुरू असते. राजकीय अनास्थेमुळे या एसटी स्थानकाचा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकार संघटनेच्या वतीने उठवला होता आवाज
मोहोळ-पंढरपूर,मुंबई-हैद्राबाद असे दोन राष्ट्रीय महामार्ग बसस्थानकाच्या दोन्ही बाजुने गेल्यामुळे मोहोळ शहरातील बसस्थानक अत्यंत मोजक्या जागेत राहिले असून इतर प्रशस्त अशा ठिकाणी बसस्थानक स्थलांतरित व्हावे,या मागणीसाठी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची येथील कै. शहाजीराव पाटील बहुउद्देशीय सभागृह येथे मोहोळ तालुका पत्रकार संघाच्यवतीने बैठक पार पडली होती. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग व मोहोळ- आळंदी पालखी मार्गाच्या चौपदीकरणामुळे मोहोळ बसस्थानक हे आता फक्त बस स्टॉफ च राहीले आहे. मोहोळ शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. या बसस्थानकात प्रवाशांची सातत्याने वर्दळ असते. तसेच शहरात 5 ते 6 शाळांचे हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी येतात. याच ठिकाणाहुन हजारो भाविक विविध तिर्थक्षेत्रासाठी ये-जा करीत असतात. या बसस्थानकातूनच लांब व जवळ पल्ल्याच्या अंदाजे 600 गाड्या ये-जा करतात. तालुक्यात मुक्कामाला जाणाऱ्या गाड्यांची संख्याही 20 च्या जवळपास आहे. प्रवाशांची व वाहनांची कमी जागेमुळे मोठी अडचण होत असून सदरचे बसस्थानक प्रशस्त जागेत स्थलांतरित करावे,अशी मागणी नागरिक करीत आहेत.
एसटी स्थानकासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेची जागा देण्याची मागणी
मोहोळ शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या तिन्ही रस्त्यांवरील एसटी गाड्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शाळेची प्रशस्त जागा देण्यात,यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून करण्यात येत आहे. यावेळी मोहोळ एसटी स्थानकाच्या संदर्भात बोलताना पत्रकार नागरिकांनी सांगितले,की मोहोळ एसटी स्थानक जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरला जाण्यासाठी भाविक याच एसटी स्थानकाचा वापर करतात. तसेच तुळजापूर,अक्कलकोट,शिर्डी येथे जाण्यासाठी याच एसटी स्थानकाचा उपयोग केला जातो. परंतु अपुऱ्या जागेमुळे सध्या मोहोळ एसटी स्थानकाची कोंडी झाली आहे. एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे आणि राजकीय अनास्थेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. अपुऱ्या जागेमुळे वाहने पार्क करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. एसटी स्थानकासमोर अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने थांबलेली असतात. त्यामुळे एसटी वाहतुकीस आणखीन जास्त अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोहोळ एसटी स्थानकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी या एसटी स्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.