#ModiSarkar2 – मोदी पर्व २ सुरू
X
नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारमध्ये २५ कॅबिनेट, ९ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि २४ राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. पंतप्रधानांसह ५८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी ९ देशातील विशेष पाहुणे, चित्रपट, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील नामांकित उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शपथविधी सोहळ्याला सुरूवात झाली आणि ९ वाजण्याच्या सुमारास हा सोहळा संपला.
कॅबिनेट मंत्री
१. नरेंद्र मोदी, पंतप्रधान
२. राजनाथ सिंह
३. अमित शहा
४. नितीन गडकरी
५. सदानंद गौडा
६. निर्मला सीतारामन
७. रामविलास पासवान
८. नरेंद्रसिंह तोमर
९. रविशंकर प्रसाद
१०. हरसिमरत कौर बादल
११. थावरचंद गेहलोत
१२. सुब्रमण्यम जयशंकर
१३. डॉ. रमेश पोखरियाल निशांक
१४. अर्जुन मुंडा
१५. स्मृती इराणी
१६. डॉ. हर्षवर्धन
१७. प्रकाश जावडेकर
१८. पीयूष गोयल
१९. धर्मेंद्र प्रधान
२०. मुख्तार अब्बास नक्वी
२१. प्रल्हाद जोशी
२२. डॉ. महेंद्रनाथ पांडे
२३. अरविंद सावंत (शिवसेना)
२४. गिरीराज सिंह
२५. गजेंद्रसिंह शेखावत
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
१. संतोषकुमार गंगवार
२. राव इंद्रजीत सिंह
३. श्रीपाद नाईक
४. डॉ. जितेंद्र सिंह
५. किरण रिजिजू
६. प्रल्हादसिंह पटेल
७. आर. के. सिंह
८. हरदीपसिंग पुरी
९. मनसुख मांडवीय
राज्यमंत्री
१. फग्गनसिंह कुलस्ते
२. अश्विनीकुमार चौबे
३. अर्जुन राम मेघवाल
४. जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह
५. कृष्णपाल गुर्जर
६. रावसाहेब दानवे
७. किशन रेड्डी
८. पुरुषोत्तम रुपाला
९. रामदास आठवले
१०. साध्वी निरंजन ज्योती
११. बाबुल सुप्रियो
१२. डॉ. संजीवकुमार बलियान
१३. संजय धोत्रे
१४. अनुराग ठाकूर
१५. सुरेश अंगडी
१६. नित्यानंद राय
१७. रतनलाल कटारिया
१८. व्ही. मुरलीधरन
१९. रेणुकासिंह सरूता
२०. सोमप्रकाश
२१. रामेश्वर तेली
२२. प्रतापचंद्र सारंगी
२३. कैलाश चौधरी
२४. देवश्री चौधरी