Home > Election 2020 > मुस्लिम बहुल मतदारसंघात 50 टक्के मोदी फॅक्टरच चालला

मुस्लिम बहुल मतदारसंघात 50 टक्के मोदी फॅक्टरच चालला

मुस्लिम बहुल मतदारसंघात 50 टक्के मोदी फॅक्टरच चालला
X

देशातील 543 लोकसभेच्या मतदारसंघापैकी 92 मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. अशा मतदारसंघातही भाजपला 45 जागी यश मिळालंय. त्यामुळं मुस्लिम मतदारांनाही आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आल्याचं निकालातून स्पष्ट होतंय.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला या 92 मुस्लिम बहुल मतदारसंघात 41 जागा मिळाल्या होत्या. तिथं आता एनडीएला 45 जागा मिळाल्या आहेत. याच मतदारसंघातील मुस्लिम मतांचं विभाजन होऊ नये म्हणून युपीएला एकगठ्ठा मतदान करण्याचं आवाहन युपीएच्या नेत्यांनी केलं होतं. मात्र, त्याकडेही मुस्लिम समाजानं दुर्लक्ष करत भाजपच्या पारड्यात मतं टाकल्याचं आकडेवारी सांगते.

पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेले 28 मतदारसंघ आहेत. येथील २८ जागांपैकी १७ जागांवर तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत तर 9 जागांवर भाजप विजयी झाला आहे. उत्तरप्रदेशमधील २३ मुस्लिम बहुल जागांवर ८ महागठबंधन आणि १५ जागांवर भाजपचा विजय झाला आहे. या ठिकाणी मायावतीनी मुस्लिम समाजातील मतदारांना एकजूट होऊन, कुठल्याही परिस्थितीत मतांचं विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन केलं होत. मात्र, त्याचाही फायदा महागठबंधनला झाला नाही.

बिहारच्या उत्तर लोकसभा मतदार संघात ३० टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहेत. 2014 च्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या भाजपला यंदा उत्तर बिहारमध्ये ५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने हिंदुत्वाचा अजेंडा राबवल्यानंतरही मुस्लिम समाजाने भाजपच्या पारड्यात मत टाकून विजय सोपा केला आहे, असं म्हणावं लागेल.

Updated : 24 May 2019 7:07 PM IST
Next Story
Share it
Top