Home > मॅक्स रिपोर्ट > कोकणात ८ तालुक्यांत मोबाईल मेडिकल युनिट

कोकणात ८ तालुक्यांत मोबाईल मेडिकल युनिट

कोकणात ८ तालुक्यांत मोबाईल मेडिकल युनिट
X

कोकणातील आठ दुष्काळी तालुक्यांत करण्यात येणार आहे. कोकणातील दुर्गम भागात फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्य सेवा पुरवली जावी, तालुक्यातील दुर्गम भगात असलेल्या वाड्या-वस्त्यांना फिरता दवाखाना उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरविणारी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या युनिटबरोबर बाईक अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध होणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना दुष्काळी तालुक्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर कोकणातील सर्व तालुक्यांत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. असा प्रस्ताव प्रशासनाने शासनाला दिला होता. त्याची अंमलबाजवणी मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी करण्यात आली आहे.

तसेच प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदा या योजनेची अंमलबजावणी पालघर जिल्ह्यात करण्यात आला असून आता ही योजना कोकणातील आठ दुष्काळी तालुक्यांत सुरू करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ पालघर जिल्ह्यातील तलासरी, विक्रमगड रायगडमधील माणगाव, श्रीवर्धन, सुधागड, रत्नागिरीतील मंडणगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वैभववाडी या तालुक्यांना होणार आहे.

Updated : 26 Oct 2018 4:11 PM IST
Next Story
Share it
Top