मिहान प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार
X
नागपूरमधील शिवणगावानं लोकसभा निवडणुकीतल्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मिहान प्रकल्पाअंतर्गत या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटला नाही.
शिवणगावाच्या पुनर्वसनाचं काम झालं असून रोजगार निर्मिती झाल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवणगावाला स्वप्ननगरी बनवण्याचं आश्वासनं दिलं होतं. ते आश्वासनही एक स्वप्नच बनून राहिल्याची इथल्या प्रकल्पग्रस्तांची भावना आहे.
शिवणगावच्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही मिहान प्रकल्पातून एकही रुपया मिळालेला नाही. प्रकल्पग्रस्तांची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. आपल्या मागण्यांसाठीचा प्रकल्पग्रस्तांचा लढा २००७ पासून सुरूच आहे. तेथील पाण्याचा प्रश्न असो रोजगाराचा प्रश्न अजूनही आ वासून उभा आहे. "आम्ही या सरकारला मत देऊन चुकलो, मात्र आता याच अधिकाराचा वापर करून आम्ही मतदानावरच बहिष्कार टाकत असल्याचं प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट केलंय. इथल्या प्रकल्पग्रस्तांशी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी बातचीत केलीय. ही बातचीत पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या
प्रत्येक परिवाराला १५०० चौरस फुटाचा प्लॉट
प्रत्येक परिवाराला नोकरी किंवा पैसे मिळायला हवेत
प्रत्येक परिवाराला घरबांधणी अनुदान मिळायला पाहिजे
प्रत्येक परिवाराला प्लाट ची सनद मिळायला पाहिजे