महानगरपालिकेचा घोळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचा झोल...
मुंबई महानगरपालिका अंतर्गत २०२२ - २०२३ वार्षिक आर्थिक बजेट मध्ये 100 प्राथमिक आरोग्य केंद्र बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर या नावाने सुरु करण्यात यावी असे नमूद करण्यात आले होते. त्यासाठी 200 कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला पण नव्याने आरोग्य केंद्र न बांधता, जुन्या आरोग्य केंद्राची दुरुस्ती करुन बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर असे नाव देण्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे. पाहुयात या विषयाचा वस्ती रिपोर्ट.
X
मुंबईतील गरीब लोकांना किंवा मध्यम वर्गीय लोकांना आरोग्याचा आजारपणासाठी मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालये हे वरदान ठरते. परंतु गंभीर आजारांसाठी खाजगी खर्चिक उपचार आणखीन स्वस्त व्हावेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने 2022 ते 2023 च्या कालावधीत आर्थिक बजेटमध्ये बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर या नावाने पुन्हा नवीन 100 रुग्णालये बांधण्यात यावे यासाठी 200 कोटी पेक्षा आधिक निधी मंजूर करण्यात आला होता. निधी मंजूर होऊन सहा महिने झाले तरीदेखील मुंबईत एल वॉर्ड मध्ये नव्याने बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर कुठेच सुरु झाले नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेने नवीन रुग्णांसाठी मंजूर केलेला निधी नेमका कुठे गेला असे वॉर्ड क्रमांक 163 मधील स्थानिक नागरिकांनी थेट महानगरपालिकेला प्रश्न विचारला आहे.
बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर ही योजना सुरु करण्यापूर्वी महानगरपालिकेने काही मुद्दे मांडले होते. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी निवासस्थानाजवळ प्राथमिक उपचार आरोग्य केंद्र सुविधा उपलब्ध करुन देण्याची योजना महानगरपालिकेने आखली होती.
ही योजना मुंबईतील प्रत्येक वॉर्ड मध्ये सुरू व्हावी यासाठी भांडवली खर्चासाठी 250 कोटी तर महसुली खर्चासाठी 150 कोटी रक्कम देणार येईल असे मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी जाहीर केले होते.या योजनेअंतर्गत स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदय रोगासाठी मोफत तपासणी केली जाणार होती. पण हे सगळं महानगरपालिकेचा दुर्लक्षितपणामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील काजूपाडा वार्ड क्रमांक 163 मध्ये डायग्नोस्टिक सेंटरचे काम हे गेल्या काही सहा महिन्यापासून सुरू असून ते सामान्य नागरिकांसाठी आरोग्य केंद्र कधी सुरू केले जात नाही त्यामुळे नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला आहे.
तर दुसरीकडे याच वॉर्डमध्ये 163 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे असलेले जुन्या आरोग्य केंद्र दुरुस्ती करून बाळासाहेब ठाकरे हेल्थ सेंटर नाव देऊन महानगरपालिकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील एल वॉर्ड मधील सह आयुक्त महादेव शिंदे यांनी देखील या योजनेअंतर्गत महानगरपालिकेची होणाऱ्या फसवणुकीकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे तेथील स्थानिक माजी नगरसेवक दिलीप लांडे यांनी कधीच जनतेचे मनातले प्रश्न ऐकले नाहीत सोडवले नाहीत आणि आरोग्याच्या बाबतीत कधीच माहिती करून घेतली नाही असे तेथील स्थानिक लोक सांगतात.
या वार्ड मध्ये 163 मध्ये महानगरपालिकेतर्फे भोंगळ कारभार सुरू असल्याचे स्थानिकांनी भावना व्यक्त केलेले आहेत. साधं हेल्थ पोस्टचे उद्घाटन करायचं असेल तर तिथे महानगरपालिकेचे अधिकारी नसतात. मेंटेनन्स डिपार्टमेंटचे देखील अधिकारी नसतात. घनकचरा मुकादामाला बोलून हेल्थ पोस्ट चे उद्घाटन केले जात. जनतेचा कर जातो तसा काहीच फायदा आम्हाला मिळत नसेल तर महानगरपालिकेने किंवा स्थानिक नगरसेवकाने जनतेची दिशाभूल करण्याचा विडा उचललेला आहे का? या प्रश्नाचे उत्तर आता आमच्याकडे देखील नाही असे तेथील स्थानिक लोकांनी भावना व्यक्त केले आहेत.
प्रभाग क्रमांक 163 सफेद पूल येथील हेल्थ पोस्ट चे उद्घाटन घनकचरा विभागाचे मुकादम श्री नितीन साबळे यांच्या हस्ते कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा मेंटेनन्स विभागाचा अधिकारी उपस्थित नव्हता.