Max Maharashtra Impact : विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिला अग्रीम पीक विमा
X
या वर्षी सप्टेंबर महिन्यात पावसाने राज्यभरात थैमान घातलं होतं पण अशाही परिस्थितीत बीड जिल्ह्यात मात्र पावसाने दडी मारली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी अग्रीम पीक विम्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यांच्या या मागणीबद्दल तेव्हा मॅक्स महाराष्ट्र ने आवाज उठवला होता. पावसाने फिरवली पाठ, पिकविम्याच्या प्रतिक्षेत शेतकरी संकटात अशी बातमी केली होती. त्याच बातमीची दखल घेत संबंधीत विमा कंपनीने शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचं वाटप केलं आहे.
जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी यावेळी सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, आपण ॲग्रीम पिक विम्यासाठी कंपनीला एक वेळा पाठवून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी अधीक्षक आणि मी सतत पाठपुरावा करून आदेश पारित केलेला होता आणि या आदेशाची अंमलबजावणी करत विमा कंपनीने अग्रीम पिक विमा बीड जिल्ह्यासाठी 57 कोटी रुपये दिलेला आहे, हा अग्रीम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे , सर्व शेतकऱ्यांची दीपावली गोड व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत आणि त्याला आम्हाला यश मिळाले आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
शिवाय बीड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याच्यासाठी आम्ही मागणी केली होती आणि याच्यासाठी जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा व जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी विमा कंपनीचे बैठका घेऊन त्यांनी विमा कंपनीला मागणी केली होती की बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे त्यांना अग्रीम पिक विमा द्यावा व तो अग्रीम पीक विम्यासाठी जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांनी जे प्रयत्न केले त्याला यश मिळाले आहे परंतु आमची अशी मागणी आहे की ज्या शेतकऱ्याने पिक विमा भरला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरच विमा कंपनीला मागणी करून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पण पिक विमा लवकर द्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत. अशी प्रतिक्रीया शेतकरी नेते मोहन गुंड यांनी दिली आहे.