Max Maharashtra Impact : वाहून गेलेला पूल बांधण्याची अशोक चव्हाण यांची घोषणा
X
सामान्यांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी यंत्रणेला भाग पाडणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रच्या आणखी एका बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील एका गावाला शाळेशी जोडणारा पूल तीनवेळा वाहून गेला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दाखवले होते. या वृत्ताची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.
अशोक चव्हाण यांनी केली पुलाची पाहणी
नांदेडपासून जवळच असलेल्या कामठा ते सावरगाव या दरम्यान असलेला पूल तीन वेळा ओढ्याच्या प्रवाहाने वाहून गेला होता. जवळच्या पाच ते सहा गावांमधून ये-जा करणाऱ्या सातशे ते आठशे विद्यार्थ्यांना रोज यामुळे त्रास सहन काराव लागत आहे. पुल नसल्याने विद्यार्थ्यांना साधारण 20 फुट खोल खड्ड्यातून ये-जा करावी लागत होती. या विद्यार्थ्यांना होणार त्रास मॅक्स महाराष्ट्रने दाखवला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरुपात तो पूल बांधला. पण पुन्हा पावसाने तो वाहून गेला. मॅक्स महाराष्ट्रने पुन्हा यासंदर्भातले वृत्त दाखवले. अखेर या वृत्ताची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली. अशोक चव्हाण यांनी स्वत: सोमवारी या ठिकाणी येऊन पाहणी केली.
१ कोटी रुपयांचा निधीची घोषणा
कामठा गावाला भेट देऊन त्यांना वाहून गेलेल्या पूलासाठी नाबार्ड अंतर्गत 1 कोटी रुपये निधी मंजूर करणार असल्याची घोषणा केली. यासोबतच कामठा ते सावरगाव या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अखत्यारीत 50 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली.