#MaxMaharashtra Impact – रायगड जिल्हा रुग्णालयाच्या दूरवस्थेचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात
X
मुंबई: रायगड जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट एक महिन्याच्या आत करण्यात येईल, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले आहे. मॅक्स महाराष्ट्रने नुकतीच या इमारतीच्या दुरवस्थेची बातमी दाखवली होती.
मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी जिल्हा हॉस्पिटलची इमारत अखेरच्या घटका मोजत असून इथे कधीही मोठी दुर्घटना घडू शकते हे वास्तव मांडणारा ग्राऊंड रिपोर्ट सादर केला होता.
याच मुद्दयावरुन आमदार प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग तालुक्यातील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले की, या रुग्णालयाच्या आंतररुग्ण इमारतीच्या रॅम्पला लोखंडी खांबाचे टेकू लावले आहे. त्याची पुर्नबांधणी करण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक जिल्हा शल्य चिकित्सकांना प्राप्त झाले असून ते जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर केले आहे. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान एका उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व जिल्हा रुग्णलयांचा आढावा घेऊन त्यांची तपासणी केली जाईल. त्यात ज्या त्रुटी आढळतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
Also Read:Ground Report : रायगड जिल्हा रुग्णालयाची इमारत मोजतेय अखेरच्या घटका