मुंबईमध्ये अनेक बेकायदेशीर नर्सिंग होम, हॉस्पिटलांचा सुळसुळाट
X
ज्याप्रकारे मुंबईत आगीच्या घटना वाढत आहेत , ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी होताना दिसत आहे . अशा वेळी मात्र मुंबईतील ८१६ नर्सिंग होम अनधिकृत असल्याची माहिती समोर येते . त्यात कोणत्याही स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा नसल्याची धक्कादायक बाब उघड होते . त्यामुळे अशा नर्सिंग होम आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे दिसत आहे .
पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी मुंबईतील अनधिकृत नर्सिंग होमची तपासणी करण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिले होते , परंतु काही वार्डमध्ये तपासणी काम सुरू झाले आहे व अनधिकृत असूनही असे नर्सिंग होम सुरू असल्याचे समोर आले आहे तसेच काही नर्सिंग होमचे परवाने केव्हाच संपले असतानाही ते अद्यापही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
जर नर्सिंग होममध्ये एखादी आगीची दुर्घटना घडल्यास त्याची मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही व अपुऱ्या जागेत रुग्णांना भरती केले जाते , तसेच अनेक रुग्णालय हे कोणतेही निकष पाळत नसल्याचे आढळून येत आहे . यामध्ये अनधिकृतपणे चालणाऱ्या नर्सिंग होमची तपासणी वेळोवेळी पालिकेच्या आरोग्य खात्याने , अग्निशमन विभाग आणि पालिकेचा इमारत व कारखाना याने करणे आवश्यक असताना हे विभाग मात्र ठोस कारवाई करताना दिसत नाही .
यामध्ये मुंबईतील एम पूर्व प्रभागातील २४ पेक्षा ज्यास्त अनधिकृतपणे नर्सिंग होम सुरू असून ज्यात अजून २४ रुग्णालय यांच्या परवानग्या केव्हाच संपल्या आहेत , त्याबाबत संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि विभागात तक्रार नोंदवून पण नियमानुसार कारवाई होताना दिसत नाही , ज्यात संबंधित यांच्याविरोधात कायद्यानुसार महाराष्ट्र जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ , महाराष्ट्र प्रादेशिक व नियोजन आणि नगररचना अधिनियम , मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अधिनियम अन्वेय कारवाई होऊ शकते , मात्र कारवाईबाबत संबंधित यंत्रणांकडून चालढकल आणि टाळाटाळ करत असल्याची खंत या विषयावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील शिरीषकर यांनी व्यक्त केली.