Home > Election 2020 > ...म्हणून रावसाहेब दानवेंनी दिला भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

...म्हणून रावसाहेब दानवेंनी दिला भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

...म्हणून रावसाहेब दानवेंनी दिला भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
X

आज भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असताना फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडली. त्त्यामुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्ष पदी रावसाहेब दानवे यांची निवड झाली. मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये दानवे यांना राज्यमंत्री पद मिळाल्यानं आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. भाजपच्या घटनेनुसार ‘एक व्यक्ती एक पद’ असा नियम आहे. दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्याने आज त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

दानवे यांच्या कार्य़काळात भाजपला राज्यात अनेक निवडणूकांमध्ये विजय मिळाला. या संदर्भात दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना लोकांनी २०१४ ला मोदींवर विश्वास ठेवला. त्याचबरोबर सर्व विरोधक मोदींच्या विरोधात एकवटले असताना देशातील जनतेने २०१९ ला पुन्हा एकदा मोदींना संधी दिली. असं सांगत मिळालेल्या आव्हानांना संधी मानत भविष्यात पारदर्शक पद्धतीने काम करणार असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

दानवे त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

Updated : 4 Jun 2019 8:36 PM IST
Next Story
Share it
Top