Home > Election 2020 > अखेर शिवेंद्रराजेंचा राजीनामा; उद्या भाजपमध्ये प्रवेश

अखेर शिवेंद्रराजेंचा राजीनामा; उद्या भाजपमध्ये प्रवेश

अखेर शिवेंद्रराजेंचा राजीनामा; उद्या भाजपमध्ये प्रवेश
X

सातारा जावळी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राजीनामा दिला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

अनेक दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या येत होत्या. आज अखेर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. त्यांच्यासोबत बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपमध्ये जाणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शिवेंद्रराजे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्यातीला वाद विकोपाला गेल्यामुळे शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं बोललं जातंय.

Updated : 30 July 2019 2:09 PM IST
Next Story
Share it
Top