Home > मॅक्स रिपोर्ट > सत्यजित तांबे यांच्या बंडामागे बाळासाहेब थोरात यांची प्रेरणा

सत्यजित तांबे यांच्या बंडामागे बाळासाहेब थोरात यांची प्रेरणा

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूकीत सत्यजित तांबे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. सत्यजित तांबे यांनी त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांच्याविरोधातच दंड थोपटले असल्याचीही चर्चा राज्यात रंगली आहे. मात्र दुसरीकडे सत्यजित तांबे यांच्या बंडामागे थेट बाळासाहेब थोरात यांचीच प्रेरणा असल्याचे म्हटले जात आहे. पण खरंच सत्यजित तांबे यांच्या बंडामागे बाळासाहेब थोरात यांची प्रेरणा आहे का? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट....

सत्यजित तांबे यांच्या बंडामागे बाळासाहेब थोरात यांची प्रेरणा
X

सत्यजित तांबेंच्या बंडाने राज्यात उडाली खळबळ आहे. डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी मुलासाठी नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूकीत उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. तर सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच भाजपची (BJP) भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांचे बंड हे कौटूंबिक कलह असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे सत्यजित तांबे यांच्या बंडामागे त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांची प्रेरणा असल्याचेही म्हटले जात आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी 1985 च्या विधानसभा निवडणूकीवेळी बंडाचे निशाण फडकवत काँग्रेसच्या (Congress) शकुंतला थोरात (Shakuntala Thorat) यांचा पराभव केला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमध्येच राहिले. राष्ट्रवादीच्या (NCP) स्थापनेनंतरही थोरात काँग्रेससशी एकनिष्ठ राहिले. पुढे बाळासाहेब थोरात यांचे मेहूणे आणि सत्यजित तांबे यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांनीही 2009 मध्ये नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यानंतर डॉ. तांबे यांनी दोन वेळा काँग्रेसतर्फे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व केले. परंतू ते कायम काँग्रेसमध्ये राहिले. आता तीच बंडाची परंपरा सत्यजित तांबे पुढे नेत आहे, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजयसिंह होलम (Vijaysingh Holam) यांनी व्यक्त केले.

सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम होण्याची शक्यता नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे बाळासाहेब थोरात यांच्यापासून सुरु झालेली बंडाची परंपरा सत्यजित तांबे पुढे नेत आहेत. मात्र ते काँग्रेस सोडण्याची शक्यता कमी असल्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजयसिंह होलम यांनी सांगितले.

Updated : 16 Jan 2023 6:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top